Saturday, September 23, 2023

तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी

नांदेड : जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैधरित्या चालणाºया जुगार अड्ड्यावर गुरूवारी एकाच दिवशी मुखेड, भाग्यनगर व नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत धाडी टाकुन जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम ताब्यात घेतली़ यामुळे जुगार खेळणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग कोरोना विषाणूला रोखण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत़ मात्र काही लोक जुगार खेळण्यामध्ये व्यस्त आहेत़ त्यांना कोरोना विषाणूचे काहीही घेणे देणे नाही़ मुखेड पोलिस स्थानकाच्या हद्दीत मुखेड ते चुना जाणाºया रोडवर हॅन्डपंपाजवळ बेकायदेशीर रित्या तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना जुगाराच्या साहित्यासह एकुण ४३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ या प्रकरणी गणपत दत्ता चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात जुगार कायद्यानुसार आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

दुस-या घटनेत भाग्यनगर पोलिस हद्दीत बेलानगर येथे दिपक पाटील यांच्या घराच्या बाजुस मोकळ्या जागेत बेकायदेशीर रित्या तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना जुगाराच्या साहित्यासह एकुण ८५ हजार ५६० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी पोलिस उपनिरिक्षक राजाभाउ सिताराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धाडीत अनेक प्रतिष्ठीत जणांसह एकुण पाच जणांविरूध्द गुन्हे नोंद केले असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक जाधव यांनी दिली़ तिसºया घटनेत ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत खुदबे नगर चौरस्ता देगलूरनाका येथे शेख अकबर शटरच्या दुकानात विनापरवाना बेकायदेशीर रित्या कल्याणमिलन नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकुन ४ हजार ८७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पांडूरंग दिगंबर भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read More  भोकर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या