24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडधर्माबादमध्ये बनावट तंबाखूची विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

धर्माबादमध्ये बनावट तंबाखूची विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : शहर व तालुक्यामध्ये एका नामांकित कंपनीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूची विक्री होत असून ह्या गंभीर बाबीकडे प्रशासनाने आता लक्ष देण्याची वेळ आली असल्याचे मत तंबाखू खवयामधून व्यक्त केल्या जात आहे.

मागील अनेक महिन्यापासून धर्माबाद शहरात आणि तालुक्यात हा बनावट तंबाखू मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे, हा तंबाखू एका नामांकित सूर्य छाप कंपनीच्या नावावर विक्री होत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे़ हा तंबाखू पूर्णत: बनावट व केमिकल मिश्रित असू शकतो, धमार्बाद शहरातील कुंटा गल्ली मधिल एका घरात हा तंबाखू तयार होत असल्याचेही दबक्या आवाजात शहरांमध्ये बोलल्या जात आहे,व तिन दिवसाखाली त्या घरातुन बनावट तबांखु व तोटा तयार करण्या चे बनावट स्टिकर आनले होते.

पण कार्यवाही न करता सोडून दिल्यामुळे शहरात उलट सुलट चर्च ला उधाण आले आहे पोलिसाच्या कार्यप्रणाली वर संशय व्यक्त केला जातो आहे . हा केमिकल बनावट तंबाखू खाल्ल्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या व्याधी जडण्याअगोदरच अन्न व भेसळ अधिका-्यांनी सदरील ठिकाणी व तालुक्यात तात्काळ धाडसत्र सुरू करून नागरिकांचे आरोग्य जपावे अशी मागणी होताना दिसून येत आहे .तिन वषार्खालील बनावट वाणी बिडी तयार करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता असेच बनावट तंबाखू करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे़

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या