22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडवाळू घाटांचा लिलाव होईना; जिल्हाधिका-यांना मार्ग मिळेना

वाळू घाटांचा लिलाव होईना; जिल्हाधिका-यांना मार्ग मिळेना

एकमत ऑनलाईन

नांदेड : गत दोन वर्षापासून जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलावासाठी अनेकवेळा जाहिर प्रगटन काढूनही लिलावालासाठी वाळू ठेकेदार प्रतिसाद देत नसल्यामुळे ३४ वाळू घाटांपैकी केवळ पाच घाटांचा लिलाव झाला असला तरी तीन ठेकेदारांनी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आजघडीला ३१ घाटांची प्रक्रिया अध्यापही पूर्ण होत नसल्यामुळे वाळू घाटांचा लिलाव होईना; जिल्हाधिका-यांना मार्ग सापडेना अशी अवस्था झाल्यामुळे जिल्ह्यात वाळू तस्करांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्यामुळे दस्तूरखुदद जिल्हाधिका-यांनाच वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी मैदानात उतरावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिलेल्या आदेशानुसार गोवर्धनघाट डंक्कीन परिसरात अवैध रेती उपसा करणारे ५० तराफे जाळून नष्ट केले. तर ३० ब्रास रेती सोमवारी जप्त करण्यात आली आहे. गोवर्धनघाट डंक्कीन परिसरातील वाळू घाटातुन अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महसूलच्या पथकाने सोमवारी सकाळी डक्कीन परिसरात जावून जवळपास ५० तराफे जाळून नष्ट केले. काही वेळातच जिल्हाधिकारी डॉ. विपीन व पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे थेट घाटावर दाखल झाले. घाटावर विक्री करण्यासाठी काढण्यात आलेली रेती अंदाजे ३० ब्रास जप्त करण्यात आली आहे.

महसूलचे पथक घाटावर पोहचताच अवैध रेती उपसा करणारे वाळू माफिये पसार झाले होते. सदर कार्यवाही तहसिलदार किरण अंबेकर यांच्या आदेशानुसार नायब तहसिलद२ार मुगाची काकडे यांच्या पथकाने जिल्हाधिका-यांच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करत कारवाई केली. सोमवारी जवळपास दिवसभर कार्यवाही करण्याचे काम सुरुच असल्याचे तहसिलदार अंबेकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अवैध रेती उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी महसूलच्या पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेक वाळुघाटावर महसूलच्या पथकाकडुन कारवाई करण्याचे सत्र सुरुच आहे. नांदेड परिसरातील गोदावरी काटाच्या वाळू घाटावर अवैध वाळूचा उपसा होत असलेतर तात्काळ नागरिकांनी महसूल विभागास कळवावे. त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे तहसीलदार अंबेकर यांनी सांगितले आहे.

गोदावरी काठावरील कौठा, असर्जन, वाजेगाव, शिकारघाट, वांगी, गंगाबेट, भायेगाव व इतर घाटांवरून अवैधरित्या वाळूचा उपसा रात्रंदिवस सुरु आहे. महसूलच्या पथकांनी या घाटावर जावून अनेक वेळा कार्यवाही केली. मात्र, वाळू उपसा तेवढ्याच जोमाने आणखी सुरु होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे खुदद जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना वाळू माफियांविरुध्द कारवाई करण्यासाठी मैदानात उतरावे लागत आहे. शासनाच्या कडक नियमामुळे वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवली आहे. यासंदर्भात वेळीच तोडगा निघाला नाही तर शासनाचा मोठा महसूल बुडणार असल्याचे महसूलतज्ञ सांगत आहेत. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी तात्काळ विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देवून याबाबत तोडगा काढणे अनिवार्य झाले आहे.

शेतक-यांच्या कर्जावरून करमाळ्यात राजकीय रंगपंचमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या