19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडलोहा तालुक्यातील वाळू चोरीचे टिप्पर पकडले

लोहा तालुक्यातील वाळू चोरीचे टिप्पर पकडले

एकमत ऑनलाईन

नायगाव : पाऊस ओसरताच लोहा तालुक्यातील कौडगाव, येळीसह अन्य वाळू घाटावरील चोरीची वाळू रात्रीला नायगाव नरसीसह खेड्यापाड्यात येत असुन, याकडे महसूल प्रशासनासह पोलीसांचे ही जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याने चोरीने काढलेली वाळू बिनधास्तपणे विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

कोरोणा महामारीपासुन लोहा तालुक्यातील कोडगाव व येळी परिसरात वाळू माफीयांनी महसूल व पोलीस अधिका-यांना हाताशी धरून, बिहारी मजुर लावून तराफ्याच्या साह्याने रात्रभर वाळू उत्खनन करून दुस-यां दिवशी हायवा टिप्परद्वारे लोहा तालुक्यासह नायगाव नरसी व खेड्यापाड्यात वाहतुक करत आहेत. या बाबत अनेक वेळा एकमत मधुन वृत प्रकाशित करण्यात आले, पण याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे नायगाव मतदार संघात हायवा टिपर मधुन वाळू वाहतुक करण्याची बंदी आहे. तरी अधिका-यांच्या पाठबळावर चोरीची वाहतुक सुरूच आहे .मागील पंधरा दिवसापुर्वी सतत पाऊस पडल्याने वाहतुक बंद होती पण गेल्या चार दिवसापासुन पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा रात्रीला वाळू वाहतुक सुरू झाली आहे.

कुंटूर पोलीसांनी एक टिप्पर पकडले:
मारतळा परिसरातून चोरीची वाळू घेऊन कहळा- गडगा रस्त्याने जात असलेल्या टिप्परला सोमठाणा शिवारात कुंटूर पोलिसांनी पकडून धाडसी कार्यवाही केली. टिप्पर चालक व मालकावर वाळू चोरीचा व गौण खनिज अधिनियमाने गुन्हा दाखल करून वाळूसह टिप्पर जप्त केला असून, सदरची कार्यवाही बिलोली सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे समजते.

चोरीची वाळू येत असल्याची माहिती बरबडा बिटचे जमादार सुवर्णकार व पोले यांना शुक्रवारी सकाळी मिळाली मिळताच त्यांनी सापळा लावला, पोहेका नागोराव कोल्हे व भार्गव सुवर्णकार यांनी कहाळ्या कडून गडग्याकडे जाणा-या एम एच २४ जि. ६१६८ हिस सोमठाणा येथे थांबून तपासणी केली असता, त्यात वाळू असल्याचे आढळले. सदरील वाहनास पकडून कुंटूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाळू वाहतूक पास नसल्यामुळे तलाठी सुनील रामचंद्र हंसपल्ले यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात वाहन चालक गोपीनाथ भुरेरा धनज ता लोहा व मालक संजय शेषेराव जाधव रा चिंचोली ता लोहा यांच्या विरुद्ध कलम ३७९, ३४ गौण खनिज अधिनियन ४८, (७, ८) प्रमाणे दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोहेका नागोरान कोल्हे करीत आहेत. या कार्यवाही मुळे नायगाव तालुक्यातील जप्त असलेल्या वाळूला भाव येणार असून महसूल विभागाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्यामुळे सदरील कार्यवाहीचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या