अधार्पूर : अधार्पूर तालुक्यातील रोडगी शिवारात एका विहीरीत बिबट्या आढळून आला. या बिबट्याला वनविभागाने यशस्वी रेश्क्यू ऑपरेशन करून जिवंत बाहेर काढले. ही घटना दि. १४ जानेवारी रोजी दुपारी रोडगी शिवारात घडली. घटनास्थळी हजारो नागरिकांनी एकच गर्दी केल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या बाबत पोलीस आणि वन विभागाच्या अधिका-यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अधार्पूर तालुक्यातील रोडगी शिवारातील गट नं. १८ मधील अनिल सुधाकर कदम यांच्या विहीरीत बिबट्या पडला असल्याची माहिती दि. १४ जानेवारी रोजी शेतक-यांना मिळाली. या शेतक-यांने लगेच मनाठा आणि अधार्पूर पोलीस ठाण्यात कळवून नांदेड वनविभागाला देण्यात आली. तोपर्यंत शेतातील विहिरीच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनी विहीरीत पडलेल्या बिबट्याचे बारकाईने निरीक्षण केले असता तो जिवंत असल्याचे लक्षात आले. अधार्पूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेऊन विहीर परिसरात जमा झालेल्या नागरिकांना पांगविले परंतु जमलेल्या नागरिकांच्या गदीर्मुळे शेतक-यांच्या शेतातील हरभरा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. काही वेळातच वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार, हदगाव परिक्षेत्राचे शरयु रूद्रावार, श्रीधर कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मानद वन्य जीवरक्षक अतिंद्र कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचलेला पिंजरा विहीरीत सोडून रेश्क्यू ऑपरेशन करून त्या बिबट्याला जिवंत बाहेर काढले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या रेश्क्यू ऑपरेशन यशस्वी होईपर्यंत येथे उपस्थित होत्या. तर पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे आणि त्यांच्या सहका-यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. अखेर बिबट्या पिंज-यात पडला आणि सवार्नी सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याला अधार्पूर येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात येत असून त्याला लवकरच सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
फुटीरतावाद्यांचा लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर मार्चचा इरादा