26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला

पैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला

एकमत ऑनलाईन

किनवट : आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने तराफा, ट्यूब व दोरीच्या साह्याने पाण्यात बुडणा-या तरूणास सुखरूप तीरावर आणले. सदरील प्रकार पाहून नदीपात्रा वरील उपस्थित नागरिक थक्क झाले. परंतु हा सर्व प्रकार संभाव्य पूरस्थितीच्या पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे कळाल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

किनवट तालुक्याची विदर्भ सीमा पैनगंगा नदी आहे. नदीपात्रावरील २२ गावे ही पूरग्रस्त आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात होते आहे. या काळात पूरासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापनाचं पथक सज्ज असणार आहे. याचाच एक भाग म्हणून किनवट शहरातील गंगानगरच्या लगत पैनगंगा नदी पात्रातील बंधा-याजवळ सोमवारी दि.१७ साहित्यासह जीवरक्षक पथक तिथे पोहोचले .जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या उपस्थितीत हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

तहसीलदार उत्तम कागणे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्या कदम, नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, अनिता कोलगणे, माधव लोखंडे, मोहम्मद रफिक, बांधकाम उप विभागाचे अभि. किशोर संद्री, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गजानन हिवाळकर, जनजागृती व मिडीया कक्षाचे उत्तम कानिंदे, मंडळ अधिकारी पी.व्ही. बुरकुले, तलाठी नवीनरेड्डी, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक तथा कार्यालय अधीक्षक चंद्रकांत दुधारे, अग्निशमन दलाचे सटवा डोखळे, रविचंद्र सुकनीकर, सुरेश चव्हाण, अल्ताफ अब्दूल गफार, शेख रियाज शेख महमद, अजहरअली ताहेरअली आणि जीवरक्षक दलातील कार्यरत सर्व कर्मचारी यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

यावेळी नदीच्या डोहात वाहून जाणा-या तसेच बुडणा-या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा हे प्रात्यक्ष दाखविण्यात आले. नदीपात्रात लाईफ जॅकेट घालून जीव रक्षक दलाचे कार्यकर्ते उतरले आणि बुडणा-या विश्वनाथ कोल्हे या व्यक्तीला अलीकडील तिराजवळ सुखरूप आणले. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता तहसिल कार्यालयातील कंट्रोल रूम २४ तास सुरु असावे. तेथील भ्रमणध्वनी क्रमांक सर्वांना उपलब्ध करून द्यावा. जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या सर्व कार्यालये व शाळा इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करावे. जीवरक्षक दल सदैव तयार असावे. जनतेनीही स्वत:हून काळजी घ्यावी.
– कीर्तिकिरण पुजार, सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्पाधिकारी, किनवट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडे मारो आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या