23.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड शाळांची दारे १ डिसेंबरपर्यंत बंदच

शाळांची दारे १ डिसेंबरपर्यंत बंदच

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरानाची वाढती रूग्ण संख्या चिंताजनक बनत असतांना आज सोमवार दि.२३ नोंव्हेबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. शिक्षकांच्या कोराना चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्याच्या या निर्णयामुळे पालकांची धाकधुक वाढली होती.अखेर या सर्व परिस्थितीची दखल घेत जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेंचीं दारे दि.१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवून दि.२ डिसेंबरपासून ती उघडण्याचा पुर्ननिर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आजपासून वाजणारी शाळेची घंटा लांबणीवर पडली आहे.

देशभरातील कोविड स्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू करता आल्या नव्हत्या. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे प्रस्तावित होते. नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या ८५८ शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या ७० शाळा आहेत .इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण ८११५ शिक्षक आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव ,त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करून अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदभार्ने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिका-यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी आर कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या.मात्र गेल्या काही दिवसात शहर परिसरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत.यात शिक्षकांची कोराना चाचणी सुरू करण्यात आली आहे.यात काही जण बाधित येत आहेत.जे शिक्षक या चाचणीत निगेटिव्ह आलेले आहेत किंवा त्यामधील सेन्टेन्स असूनही निगेटिव्ह आलेले आहेत अशा लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे तसेच ज्यांची ही चाचणी झालेली आहे त्यांचे चाचणी रिपोर्ट प्राप्त करणे यासाठी संपूर्ण तपासणीचा अहवाल येणे आवश्यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन आज सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. आता इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दि.२ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.दरम्यान जिल्ह्यातील २२८२ शिक्षकांची एंटीजन टेस्ट करण्यात आली असून ४९८२ शिक्षकांची तपासणी करणे सुरू आहे. यापैकी ९२७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे .२७०२ जणांची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करून घेण्यात येत आहे. दि.१ डिसेंबरनंतर सर्व स्थिती सुरळीत करुन दि.२ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येतील असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे धाकधुक वाढलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी सुरूच
जिल्ह्यातील २२८२ शिक्षकांची एंटीजन टेस्ट करण्यात आली असून ४९८२ शिक्षकांची तपासणी करणे सुरू आहे. यापैकी ९२७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे .२७०२ जणांची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करून घेण्यात येत आहे.

भारती आणि हर्षला न्यायालयीन कोठडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या