22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडउद्यापासून जिल्ह्यातील शाळा सुरू

उद्यापासून जिल्ह्यातील शाळा सुरू

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या जिल्हयातील सर्व शाळा प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आज मंगळवार दि.१५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्यास सध्या सूचना नाहीत. परंतु सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांनी आवश्यक ती काळजी घेऊन शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.

मागील वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांन शेैक्षणिक सत्रास मुकावे लागले होत.ेलॉकडाऊनमुळे शाळच बंद ठेवाव्या लागल्या.यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असतांना कोरानाच्या दुस-या लाटेमुळे पुन्हा सर्व काही ठप्प झाले होते.सध्या कोरोनाची लाट ओसरल्याने नांदेड जिल्हा नुकताच अनलॉक करण्यात आला आहे.यानंतर शासनाकडून मिळालेल्या सुचनेनूसार जिल्हयातील सर्व शाळा आज दि.१५ जूनपासून सुरू होत आहेत.शाळा जरी सुरू होत असल्या तरीशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्यास सध्या सूचना नाहीत. परंतु सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांनी आवश्यक ती काळजी घेऊन शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे बंधनकारक राहणार आहे.

तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तांची पाठ्य पुस्तके उपलब्ध होतील व त्यांचे ऑनलाइन माध्यमातून तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमव्‍दारे शिक्षण सुरु ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत. माझी शाळा सुंदर शाळा, वृक्षारोपण यासह शालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होईल, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच गोष्टींचा शनिवार या उपक्रमातून वाचनासाठी विद्यार्थ्‍यांना एक तास वाचनकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या काळात शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे.

नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदे मार्फत चालविल्या जाणा-या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे २४ हजार ४६८ शिक्षक तर ६ लाख ९५ हजार १२१ विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे ९ हजार २२३ शिक्षक तर २ लाख ६ हजार १६९ विद्यार्थी आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता ऑनलाईन किंवा गृहभेटीतून शिक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक, कर्मचा-यांना शाळेत उपस्थित राहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु या सर्व कर्मचा-यांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षितअंतर ठेवणे, हँड वॉशचा वापर करणे गरजेचे राहणार आहे.

नवे शेैक्षणिक वर्ष सुरू : ठाकुर
नवे शैक्षणिक वर्षच दि.१५ जूनपासून सुरू होत आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. जिथे इंटरनेट किंवा मोबाईलचे अडचण आहे तेथे गाव पातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करावेत व कोरोनाच्या त्रिसुचीचे पालक करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत,असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी एकमतशी बोलतांना सांगीतले.

जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या