22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडएका कृषि सेवा केंद्रास सील:दोन दुकानदारांना १० हजाराचा दंड

एका कृषि सेवा केंद्रास सील:दोन दुकानदारांना १० हजाराचा दंड

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी: संचारबंदीत दिलेल्या वेळेचे बंधन न पाळणा-या एका दुकानास सील लावण्यात आले तर अन्य दोन दुकानदारांना १० हजाराचा दंड लावण्यात आला़ परवानगी पात्र कृषी सेवा केंद्र सकाळी ७ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश असतांना कुंडलवाडी शहरातील तीन कृषी सेवा केंद्र चालक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले व्यवसाय चालू ठेवल्यांचे मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्या निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली.

यातील माऊली कृषी सेवा केंद्र व शिवकृपा कृषी सेवा केंद्र या दोन कृषी सेवा केंद्र चालकास प्रत्येकी ५ हजारचा दंड तर दत्तकृपा कृषी सेवा केंद्रास सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा व्यतिरिक्त जास्त वेळ कृषी सेवा केंद्र चालू ठेवणा-यांचे धाबे दणाणले आहेत़या कारवाई मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,लिपीक गंगाधर पत्की,मारोती करपे,जनार्दन करपे,लेखपाल,अभियांता सिरसाठ,धोंडीबा वाघमारे आदींचा समावेश होता.

चौकट मध्ये फोटोसह घ्या. कुंडलवाडी शहरातील व्यापारी व नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत संचारबंदी नियमाचे पालन करावे. घरीच रहावे,सुरक्षीत रहा,अत्यावशक कामा शिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे़

Read More  अधार्पूर : अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या