30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडअर्धापूर कोव्हिड योद्यांची सुरक्षा रामभरोसे..!

अर्धापूर कोव्हिड योद्यांची सुरक्षा रामभरोसे..!

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अर्धापूर शहर व तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत गाव स्वच्छता करणारे सफाई कामगार कोरोना काळात कोणत्याही सुरक्षा साधना विनाच काम करित आहेत. अशा प्रकारे गावातील घाण, कचरा व तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करणा-्या या कोरोना योद्याची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचे पहावयास मिळते आहे.

कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य जनतेला सेवा देणारे डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सफाई कामगार अशा अनेक कर्मचान्यांना कोरोना संसर्ग होऊन स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. तरीही हे कर्मचारी आजही तेवढ्याच तत्परतेने आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र अजूनही प्रशासनाकडून या कर्मचा-्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधार्पूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी शहरातील कचरा भरतांना, साफसफाई करतांना कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर करतांना दिसत नाहीत. तर नगर पंचायत प्रशासनानही याकडे लक्ष देत नाही. त्याच प्रमाणे तालुक्यातील मालेगाव, लहान, येळेगाव, कामठा, निमगांव, चाभरा व पार्डी ( म. ) येथील मोठ्या गावातील ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुध्दा गाव स्वच्छता करणा-या सफाई कामगारांना सुरक्षेचे कोणतेही साधन पुरविले जात नाही. त्यामुळे घाणीचे काम करणा-या सफाई कामगारांची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे.

अधार्पूर शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशाही परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतू तसे न होता जणू काही कोरोना संसर्ग संपल्या प्रमाणे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष याकडे कमालीचे दुर्लक्ष करित आहे. दरम्यान अधार्पूर नगरपंचायत स्वच्छता कर्मचा-यांचे सेवाकार्य सुरक्षा साधनांविनाच सुरू असुन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असताना अत्यावश्यक सेवेत असणा-या नगर पंचायत व ग्राम पंचायतीच्या स्वच्छता विभागातील या गाफील कारभाराने शहर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचे काम करणारे कोरोना योध्दे यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच कोरोना बाधित रूग्ण आढळलेल्या भागात जाऊन हे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे काम करतात. एकीकडे विना मास्क फिरणा-्या नागरिकांना नगरपंचायत प्रशासन पाचशे रुपये दंड लावत आहे. मात्र त्यांच्याच विभागातील स्वच्छता कर्मचारी हे विना मास्क साफसफाईची कामे करताना दिसत आहेत. कोरोना संसगार्चा वाढता फैलाव लक्षात घेऊन उपाय योजना करणे गरजेचे असताना नगरपंचायत प्रशासनाकडून ढिसाळ व कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून आत्यावश्यक सेवेमध्ये काम करणा-्या या सफाई कर्मचा-्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यांना चांगल्या दजार्चे हंडग्लोज, मास्क, शुज, ड्रेस आदींसह सॅनिटाइजर, साबण उपलब्ध करून देऊन त्यांच्या वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या व तपासण्या करणे आवश्यक आहे. तसेच त्यांना विमा कवच देण्यात यावे. अशी सुजाण नागरिकांकडून मागणी होत आहे.

कोरोना संसर्गाच्या विळख्यात शहर स्वच्छतेचे काम करणा-या सफाई कर्मचा-यांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागणारे संपूर्ण साहित्य स्वच्छता ठेकेदार यांच्याकडून पुरविण्यात यावेत. अशा सूचना नगरपंचायत प्रशासनाकडून स्वच्छता ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.
एच. पी. गवळी
स्वच्छता निरीक्षक,न. पं. अधार्पूर

जि.प.अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या