21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडबियाणी हत्याकांड : दोन आरोपींची वाढ ; ४ जुलैपर्यंत कोठडी

बियाणी हत्याकांड : दोन आरोपींची वाढ ; ४ जुलैपर्यंत कोठडी

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात मंगळवारी आणखी दोन आरोपी वाढले आहेत़ पोलीस पथकाने न्यायालयात हजर केलेल्या दोघांना मकोका विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दि़४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. दरम्यान या हत्याकांडात आता एकूण आरोपींची संख्या १५ झाली आहे.

बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्यासुमारास सन्मीत्रनगर नांदेड येथील त्यांच्या घरासमक्ष पिस्तुलमधून गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यत १३ जणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहेत. तर सुरू असलेल्या तपासात पोलिसांनी दि. २७ जून रोजी रात्री १० च्यासुमारास गुरप्रितसिंघ उर्फ दाण्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा वय ४२ रा. दशमेशनगर नांदेड व कमलकिशोर गणेशलाल यादव ३८ रा. दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद नांदेड या दोघांना अटक केली.

मंगळवारी २८ जून रोजी या दोघांना सहाय्यक पोलिस अधींक्षक अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस निरींक्षक चंद्रकांत पवार, पोलिस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्यासह अनेक पोलिस अंमलदार आणि आरसीपी पथकातील जवांनांनी न्यायालयात हजर केले. युक्तीवाद ऐकून पुढील चौकशीसाठी न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी गुरप्रितसिंग खैरा आणि कमलकिशोर याद या दोघांना सहा दिवस अर्थात दि़ ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या