नांदेड : माळटेकडी भागातील एका पत्राच्या गोदामांमध्ये शासकीय वाटप प्रणालीतील स्वस्त धान्याचा अवैध साठा चोरट्या मार्गाने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून इतवारा पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन ९५ हजार ५५० रूपयांचा गहु, तांदुळ जप्त केला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळटेकडी भागातील महंम्मद रिजवान महंम्मद खलील यांचे पाच गोदाम असून, त्यात धान्याचा मोठा साठा असल्याची माहिती इतवारा पालिसांना मिळाली़ पालिसांनी दि़२१ रोजी सदर ठिकाणी धाड टाकुन तांदळाचे ५० किलो वजनाचे ३५७ पोते आणि गव्हाचे ४२ पोते असा माल सापडला. या मालाची किंमत ९५ हजार ५५० एवढी असून, सदर माल हा शासकीय वाटप प्रणालीमधील स्वस्त धान्य असल्याचे उघड झाले़ या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गणेश घोटके यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुत्यपोड हे करीत आहेत.