21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडपालकमंत्री चव्हाणांना सेनेने दाखविले काळे झेंडे

पालकमंत्री चव्हाणांना सेनेने दाखविले काळे झेंडे

एकमत ऑनलाईन

बिलोली (दादाराव इंगळे) : विकास कामांच्या लोकार्पण सोहळयास बिलोलीत गेलेले पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना रविवारी आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडूनच काळे झेंडे दाखविण्यात आले. अर्धवट विकास कामांच्या उद्घाटनाची घाई करण्यात येत आहे तसेच माजी आमदार सुभाष साबणे यांना कार्यक्रमास बोलविण्यात आले नाही, असा आरोप करित सेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

विकास कामांच्या लोकार्पण सोहळयास बिलोलीत गेलेले पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना रविवारी आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडूनच काळे झेंडे दाखविण्यात आले. अर्धवट विकास कामांच्या उद्घाटनाची घाई करण्यात येत आहे तसेच माजी आमदार सुभाष साबणे यांना कार्यक्रमास बोलविण्यात आले नाही,असा आरोप करित सेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

आघाडीतील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी बिलोली तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पन सोहळा, भुमीपुजनासह कार्यकर्ता मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. लोहगाव येथील आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीचे व निवास्थानाचा लोकार्पण सोहळा झाला पंरतु यातील बरीच कामे अर्धवटच आहेत. केवळ बिलोली देगलुर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून प्रचारात एवढी कामे केल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आणि विधानसभा निवडणूक लागताच आचारसंहीता लागल्यावर काही करता येणार नाही, यामुळे लोकार्पण सोहळयाचा खटाटोप करण्यात आला असा आरोप सेनेच्या कार्यकत्यांमधून होत आहे.

एवढेच नव्हे तर आघाडी सरकारमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबने यांना कार्यक्रमाला निमंत्रण देण्याचे टाळण्यात आले.शेतक-यांना गेल्या दोन वर्षापासून पिक वीमा मिळाला नाही.याचा संताप व्यक्त करित पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यावर काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे सेनेच्या काही कार्यकर्त्यांना बिलोली पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालु होती.

आंदोलनानंतर पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते घाईघाईने लोकार्पण सोहळे उरकण्यात आले. दरम्यान लोहगावच्या आरोग्य केंद्राचा फक्त गिलावा व फर्सी झाली असून इतर सर्वच काम अपुरे आहेत तर निवास्थानचे केवळ छत टाकण्यात आले आहे.बिलोली नगरपालीकेला ही वरच्या मजल्यावर भेगा पडल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान कोरोणाचा काळ असताना मंत्री महोदयाच्या या दौ-यात कुठेच शोसल डिस्टसिंग पाळण्यात आलेले नाही. प्रत्येक ठिकाणी तुफान गर्दी पहावयास मिळाली.देगलूर विधानसभा मतदार संघाची येत्या काळात पोटनिवडणूक होणार आहे.यामुळे राजकीय हेवादेवे सुरू झाले आहेत.राज्यात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना मोठा पक्ष आहे.मात्र सत्ताधारी पक्षाच्याच माजी आमदारांना बिलोलीतील लोकार्पण सोहळयास जाणीवपूर्वक डावलले अशी चर्चा होत आहे.

साबणे आगाऊपणा करु नका : आ.राजूरकर
पूर्वी पासूनच देगलूर विधानसभेची जागा काँग्रेसची आहे. ज्या पक्षाची जागा आहे त्यांनीच ती लढावी असे ठरले आहे. सुभाष साबणे तुम्ही आगाऊपणा करू नका, तुम्ही कडवे शिव सैनिक आहात. तुम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे. तुम्ही काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा द्या असे आवाहन आ.अमर राजूरकर यांनी जाहिररित्या केले आहे. यावरून आ. राजूरकर घाबरल्याचे दिसून येत आहेत. एवढेच नव्हेतर माजी आमदार असलेल्या साबणेंना आगाऊपणा करु नका असे शब्द वापरल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यात संताप पसरला आहे.

षडयंत्र सहन करणार नाही : समन
आजपर्यत पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे दावपेचाचे राजकरण करत आले असून हे शिवसेना हे कदापी सहन करणार नाही.आज कामाची उदघाटने करत पालकमंत्री फिरत आहेत, त्यातील बहुतांश कामे हे माजी आ.सुभाष साबने यांचे आहेत.त्यांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही किंवा बँनर वर एखादा फोटो सुधा लावण्यात आला नाही हा महा विकास आघाडीचा धर्म आहे का? ते फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ पा.समन यांनी केला आहे.

विंडोज १० बंद होणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या