29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडज्येष्ठ साहित्यिक प्रा.तु.शं.कुळकर्णी अनंतात विलीन

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तु.शं.कुळकर्णी अनंतात विलीन

एकमत ऑनलाईन

नांदेड : मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे आधारस्तंभ प्रा. तुकाराम शंकरराव उर्फ तु.शं. कुलकर्णी यांचे शनिवारी, १० एप्रिल रोजी दुपारी नांदेड येथील विद्युतनगर निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. वैद्यकीय महाविद्यालयास मृतदेह दान केला.
त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम, ३ मुले श्याम, ज्येष्ठ पत्रकार राजीव, संजीव,मुलगी,सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विष्णुपुरीतील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दान करण्यात आले आहे.ते मूळचे डोंगरकडा ता.कळमनुरीचे रहिवासी होते.त्यांनी अनेक वर्षे औरंगाबादच्या सरस्वती भूवन महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले. तृणाची वेदना, ग्रीष्मरेखा, अखेरच्या वळणावर हे कुलकर्णी यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

समापच्या प्रतिष्ठान मासीकाचे संपादक व परीषदेचे कार्यवाह म्हणून १५ वर्ष जबाबदारी स्वीकारली अ. भा.सहिते महामंडळावर प्रतिनिधित्व केलं आहे. सन २०१६ साली मसापने त्यांना जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

निजामकालीन अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो : पालकमंत्री अशोक चव्हाण
निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्ती मिळावी यासाठी जो मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, त्या संक्रमण काळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून, एक साक्षीदार म्हणून जेष्ठ साहित्यिक तु.ष. कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जायचे. मराठी साहित्याच्या कवितेपासून ललित लेखनापर्यंत व समिक्षेचाही प्रांत त्यांनी समन्वयाच्या भुमिकेतून हाताळत मराठी साहित्यात वेगळी प्रतिभा निर्माण केली. नांदेड येथील राहिवासी असल्याने स्वाभाविकच त्यांचा सर्वांना अभिमान राहिला. प्रज्ञा भास्कर आचार्य नरहर कुरुंदकर , जेष्ठ संपादक स्व. अनंतराव भालेराव, वा. ल. कुलकर्णी, स.मा.गर्गे अशा मराठवाड्यातील सारस्वतांच्या प्रवाहातील ते एक प्रवाही व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने निजामकालिन संक्रमण काळातील अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो आहोत, या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शोक संदेशात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण कवी व साहित्यिक हरपला : मा.खा.खतगांवकर
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ग्रामीण कवी व साहित्यिक म्हणुन परिचित असलेले आमच्या श्री साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकरनगर शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीप धोंडीबा पाटील यांचे अकाली निधन झाले. प्रदीप पाटील हे आमच्या संस्थेत सन १९९२ पासून कार्यरत होते, त्यांना लिखान व वाचनाची सवय होती. त्यांच्या गावकळा ह्व या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता व तसेच त्यांचे अध्यापन ही चांगले होते. ग्रामीण भागाची जाण असणारा कवी, साहित्यिक व शिक्षक हरवल्याने संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात मा.खा.भास्करराव पाटील खतगांवकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. स्व.प्रदीप पाटील यांच्या कुटूंबियावर कोसळलेल्या दु:खात मी व खतगांवकर कुटूंबिय सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटूंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभु चरणी प्रर्थना.

जेष्ठ साहित्यिक काळाच्या पडद्याआड : आ.राजुरकर
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्वर्यू प्रा. तु.शं. कुलकर्णी यांच्या निधनाने एक ज्येष्ठ साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या साहित्यातून लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटायचे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व कुलकर्णी कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.

कोरोना तपासणी वरुन तीन मेडिकल चालकाविरुद्ध कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या