31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home नांदेड नांदेडात खळबळ : कोंबड्यासह शेकडो मधमाशांचा मृत्यु

नांदेडात खळबळ : कोंबड्यासह शेकडो मधमाशांचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूचा धोका वाढत आहेत.याचे लोन आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यापर्यंत पसरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवडाभरात मौजे चिंचोर्डीत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला.तर दि.११ जानेवारी रोजी सकाळी अनेक ठिकाणी शेकडो मधमाशाही मृत्युमुखी पडल्याचे रुख्मिणी नगर परिसरात दिसून आले.या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान येथील मृत कोंबड्याचे सॅम्पल तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. शेकडोंच्या संख्याने पोपट,कावळ्यांचा आणि यानंतर मधमाशांचा मृत्यू होत आहे.आता हा व्हायरस नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात पसरत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील नागरिकांच्या कोंबड्या दिवसभर बाहेर चरून घराकडे आलेल्या शेकडो कोंबड्या रात्रीला झाकून ठेवल्यानंतर सकाळी त्या मृतावस्थेत आढळून आल्याने कोंबडी ,पशु पालन करणा-यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचा प्रत्यय हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील तीन नागरिकांना आला असून, घरातील शेकडो कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्या आहेत.

चिंचोर्डी येथील तुकाराम माधव झिंगरे २५, भारत रामजी झाडे ५६, नागोराव गोमाजी ढोले यांच्या ३० कोंबड्या आठ दिवसात अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्या आहेत. तर शहरातील रुख्मिणी नगर भागात दि.११ रोजी सकाळी अनेक लोकांच्या छतावर, रस्त्यावर शेकडो मधमाशा मृत्युमुखी पडल्याचे पाहवयास मिळाले आहे. यामुळे पशुपालक,गावक-यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.या कोबड्यांचा व मधमाशांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला की अन्य कोणत्या कारणाचे झाला याचे संशोधन लवकरात लवकर करावे अशी मागणी होत आहे.दरम्यान या घटनेची दखल गंभीरतेने घेण्यात आली असून मृत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आले आहे.या अहवाल आल्यावर कोंबड्या व मधमाशांचा मृत्यु कशामुळे झाला हे स्पष्ट होईल असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी सांगीतले.

भाजपा म्हणजे भंगार पक्ष; ममता बॅनर्जी यांचा हल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या