34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeनांदेडअल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

एकमत ऑनलाईन

कुंटूर : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील एका मुलाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पीडित मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले असल्याने पीडित मुलीच्या फियार्दीवरून कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सुजलेगाव येथील एका मुलाने १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुली सोबत प्रेम करतो तुज्याचसोबत लग्न करतो म्हणून तिच्या मनाविरुद्ध दोन वर्षांपासून ते दिनांक ७ ऑकटोबर पर्यँत वारंवार शारीरिक संबंध ठेऊन लग्नास नकार दिल्याने पीडित मुलीच्या फियार्दीवरून मुलांविरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्यात कलम ३७६, (३),३७६,(२).(एन) भादंवि सह कलम ४,६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायदा २०१२ प्रमाणे गुन्हा नोंद करून सुजलेगाव येथील सदर मुलास पोना. अब्दुल बारी ,विवेक ईश्वर यांनी मुखेड तालुक्यातील जांभळी येथून चार तासात त्या मुलास अटक करण्यात आली. अधिक तपास सपोनि. करीम पठाण हे करीत आहेत.

लातूर मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत; प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे -निजाम शेख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या