21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडनिर्दयी बापाकडून नऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

निर्दयी बापाकडून नऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

एकमत ऑनलाईन

नांदेड : आपल्याच नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून एका जनदात्या निर्दयी बापाने नात्यांना काळिमा फासल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.पोलिसांनी या नराधम बापाला गजाआड केले आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा अर्थात १६ जूनच्या १ वाजता नांदेड ग्रामीण पोलिसांनी या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नांदेड ग्रामीण पोलीस राहणा-या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार १५ जूनच्या रात्री तिच्या ९ वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिने घरात जाऊन पहिले असतांना बालिकेने सांगितले की,तिच्या बापानेच तिच्या सोबत लैगिक अत्याचार केला आहे.

आईने आपल्या नव-याला याबाबत विचारणा केली तेव्हा हि बालिका माझी नाही असे सांगत त्याने पत्नीला मारहाण केली. दि.१५ रोजी सकाळीच आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन माहेर गाठले. तिला एकूण चार मुली आहेत.एकीचे लग्न झालेले आहे. सर्वात लहान बालिका ९ वर्षांची आहे. तिच्यावरचा बापाने लैगिक अत्याचार केला आहे. घाबरलेली आई अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गेली आणि आपल्या बालिकेवरील अत्याचार सांगितला. वजिराबाद पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर घटना घडली ती जागा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना नांदेड ग्रामीणचे पोलीस बोलावून तिकडे पाठवले.नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नराधम बापा विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ३८७/२०२१ दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस उप निरीक्षक गणेश होळकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी नराधम बापाला गजाआड केले आहे.

दि.१६ जून रोजी पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर, पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी, माधव गिते, राजरत्न इंगोले आणि गृहरक्षक दलाचे जवान गोपाळ पवार यांनी नराधम बाप बालाजी यास न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अ‍ॅड. मनीकुमारी बत्तुल्ला (डांगे) यांनी न्यायालयासमक्ष मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एस.खरात यांनी नराधमास दोन दिवस अर्थात १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

कृषी व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या