30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडशंकर नागरी बँक घोटाळा; पंधरावा आरोपी ताब्यात

शंकर नागरी बँक घोटाळा; पंधरावा आरोपी ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड: मराठवाड्यात गाजलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुंबईच्या लोखंडवाला कॉम्लेक्समधून आणखी एका आरोपीला पकडले आहे. आता या प्रकरणात एकुण १५ आरोपी झाले आहेत. कर्नाटक बँकेचे धनादेश पुस्तक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड असे दस्तावेज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शंकर नागरी सहकारी बँकेतील साडे चौदा कोटी रुपयांचा ऑनलाईन घोटाळा मराठवाड्यात गाजला होता. शंकर नागरी सहकारी बँकेचा १४ कोटी ४६ लाख रुपयांचा घोटाळा त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खाते हॅक करून करण्यात आला. याबाबतचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणातील सर्वाधिक गुन्हेगार नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वात बँक घोटाळ्याकडे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड तपासासाठी परिश्रम घेत आहेत. सोबतच नांदेड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी मेहनत घेत आहेत.

या घोटाळ्यातील पंधरावा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव आणि पोलीस कर्मचारी लोखंडे आणि बालाजी केंद्रे यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून आज सकाळी पकडून आणलेल्या अभिजित अंदानी शेट्टी वय ४५ यास वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.या आरोपीने २० लाख रुपये बँक घोटाळ्यातील विविध आरोपींना वळती करून दिले आहेत. कर्नाटक बँकेचे धनादेश पुस्तक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड आणि अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.आत्तापर्यंत या घोटाळयात पंधरा आरोेपी पकडण्यात आले आहेत.

कृषी कायद्यांबाबत पवारही भूमिका बदलतील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या