नांदेड : जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादक शेतक-यांना हक्काची कॉटन इंडस्ट्रीज मिळावी, यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून लोहयातील पिंपरणवाडी येथे शांतीदूत कॉटन इंडस्ट्रीज उभारण्यात आली आहे. या इंडस्ट्रीचा उद्या दिनांक २८ सोमवारी सकाळी ११ वाजता खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यांनी दिली.
ग्रामीण भागातील कापूस उत्पादक शेतक-यांची ही अडचण लक्षात घेता परिसरातील शेतक-यांच्या समृद्धीसाठी शांतिदूत प्रतिष्ठान आपल्या पाठीशी या उदात्त भावनेतून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून लोहा तालुक्यातील ंिपपरणवाडी येथे शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीज उभारण्यात आली आहे. या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून या कापूस खरेदीचा आणि शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीचा भव्य शुभारंभ उद्या दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पिंपरणवाडी येथ खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपाचे मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजय कौडगे, आ. तुषार राठोड, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य देशमुख, देशमुख मिंिलद देशमुख, राजेश देशमुख कुंटूरकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर आदींची उपस्थिती राहणार आहेÞ