बिलोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पास केलेले कृषी विधेयकास पाठिंबा दिल्यास अथवा राज्यात लागु केल्यास शरद पवारांना राज्यातले सरकार पडेल अशी भिती वाटत आहे असे मत भाजपाचे खा.प्रताप पा.चिखलीकर यांनी व्यक्त केले. बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शेतक-यांशी संवांद व पिक पाहणी शेत शिवार कार्यक्रमात बोलत ते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारित केलेल्या कृषी विधेयकाचे शेतक-यांना महत्त्व पटवुन सांगण्यासाठी खा.चिखलीकर रविवारी बिलोली तालुका दौरा केला यात लोहगाव,आरळी,पिंपळगाव,अन्य ठिकाणी शेतात जावुन पाहणी करत शेतक-यांना विधेयका बाबतीत समजावुन सांगितले.
यावेळी यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व्यंकट पा.गोजेगावकर, डाक्टर आघाडीचे प्रांत अध्यक्ष डॉ.अजित गोपछेडे, श्रावन पा.भिलवंडे, शेत शिवार अभियानाचे जिल्हा आयोजक तथा जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड,युवा मोच्यार्चे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख,दलीत आघाडीचे प्रांत अध्यक्ष मारोती वाडेकर,विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल ढगे, जिल्हा चिटणीस आनंद पा.बिराजदार, जिल्हा कार्यकारिनी सदस्य राजेंद्र रेड्डी तोटावाड, माजी उपसभापती उमाकांत गोपछेडे, ता.अ.श्रीनिवास पा.नरवाडे, मारोती राहीरे, शांतेश्वर पा.लघुळकर, प.स.सदस्य संभाजी शेळके, नागनाथ पा.माचनुरकर, धोंडु सावकार कोत्तावार, बापूराव पा.खपराळकर,गंगाधर अनपलवाड, बालाजी देशमुख लोहगावकर, शैलेश पा.चिंचाळकर, लोहगावचे माजी सरपंच महाजन उमरे, शंकर रेड्डी तोटावाड, हनमंत कनशेटे, विठ्ठल तुकडेकर, महीला आघाडीच्या सौ.शिवकन्या सुरकुटलावार, सौ.सुलोचना स्वामी, राजु पा.कंदमवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे
सुत्र संचलन भाऊसाहेब बनबरे यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.