24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeनांदेडशिरसाट यांनी शासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

शिरसाट यांनी शासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

मारतळा : लोहा येथील प्रशासकीय इमारती वर भीमराव शिरसाट या दिव्यांग शेतक-्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते आत्महत्या का केली याचे गुड आध्यप कायम असले तरी शासनाच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे. मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जुकलवाड यांनी पीडित कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केले.

भीमराव शिरसाट यांची आत्महत्या नसून हत्या असून याविषयी आवाज दाबल्या जात आहे. ही केवळ गप्प बसण्याची वेळ नसून भीमराव शिरसाट यांनी यांना न्याय देण्याची आहे मयत भीमराव यांची बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया मन्यार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी दिली दिनांक 3 जुलै रोजी भीमराव शिरसाट दिव्यांग शेतक-यांनी तहसील प्रशासकीय इमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे तालुक्यात चांगलेच वातावरण तापले होते. अनेक सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन तहसीलदार यांना जाब विचारला परंतु तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सामाजिक संघटनेच्या पदाधिका-्यांवर ३५३ चे गुन्हे दाखल करून हे प्रकरण वळवण्यात आले आहे.

या प्रकरणाला बारा दिवस उलटले असले तरी मतदार संघातील एकाही राजकीय पुढा-्यांनी या कुटुंबाला भेट दिली नाही आज मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जुकलवाड यांनी कुटुंबाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. भीमराव शिरसाट यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असून या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे व भीमराव शिरसाट यांची आत्महत्या नसून ही प्रशासनाने केलेली आत्या आहे. भीमराव शिरसाट यांनी मला आत्महत्या करायची होती तर प्रशासकीय इमारतीचिच काय गरज होती. अधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी भीमरावाचे तहसील मध्ये कोणतेच काम नसल्याचे सांगून खोटे बोलत आहेत. शिरसाट यांचे अनेक कामे या प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयात होती. त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रकरण अधिकारी यांच्या अंगलट येणार असल्याने सर्व प्रकरण मॅनेज केले आहे.

भीमराव शिरसाठ के परत येणार नाहीत परंतु लोहा तालुक्यात दुसरा भीमराव घडता कामा नये यासाठी मोठे आंदोलन उभारले पाहिजे अशी प्रतिक्रिया एकनाथ पवार यांनी दिली भीमराव शिरसाट यांनी दिव्यांग व्यक्ती साठी व शेतक-्यासाठी बलिदान ही वेळ गप्प बसण्याची नसून शिरसाट यांना न्याय मिळवून देण्याची आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही तोपर्यंत माजी सैनिक संघटना गप्प बसणार नाही असा इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जुकलवाड यांनी दिला आहे.

मराठीसह ११ भाषांमध्ये मिळणार इंजिनिअरिंगचे शिक्षण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या