कंधार : शिवसेनेतील बंडखोर आमदारांबाबत गेली तीनचार दिवसांपासून शिवसैनिकांकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. बंडखोरांचा निषेध नोंदवला जाऊन संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कंधार तालुक्यातील शिवसैनीकांनी कंधार येथील महाराणा प्रताप चौकात जमा होऊन तिव्र निषेधार्थ घोषणाबाजी करत बंडेखोर मंत्री व आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून संताप व्यक्त केला.
गत आठ दिवसांत सुरू असलेला शिवसेनेच्या आमदारांनी केलेली बंडखोरी तळागाळातील शिवसैनिकाला आवडली नाही. तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. आज आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शिवसैनीकांनी महाराणा प्रताप चौकात जमतं तिव्र निषेधार्थ घोषणाबाजी करत बंडेखोर मंत्री व आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, गणेश कुंटेवार,तालुकाप्रमुख
परमेश्वर पाटील जाधव, तालुका संघटक पंडीतराव देवकांबळे, शहरप्रमुख बाळू पाटील लुंगारे, पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण, वाहतुक सेना तालुकाप्रमुख व्यंकट मोरे, सर्कलप्रमुख अॅड. भगवान जाधव, शिवाजी पाटील कदम धानोरा, शेल्लाळी संरपंच राजु केंद्रे माधव लुंगारे, अजिंक्य यन्नावार, अतुल पापीनवार, अल्ली साहेब, नागोराव जाधव, चंद्रकांत शेंडगे, पंडीतराव पेठकर, प्रल्हाद जाधव, माधव लुंगारे, प्रकाश जाधव, गणेश फुलवळे,राजीव लुंगारे, जगदीश राठोड, मनोहर लुंगारे,मनोहर पेठकर, शिवप्रसाद जाधव,बालाजी पेठकर, गंगाधर लुंगारे यांच्या सह अनेक युवासैनिक,शिवसैनिक उपस्थित होते.