23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडशिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात जिल्ह्यात आंदोलन

शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात जिल्ह्यात आंदोलन

एकमत ऑनलाईन

नांदेड : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन देत बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्या वतिने हदगाव, देगलूर, लोहा व अन्य तालुक्यातच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थन देण्यासाठी आंदोलन सुरू केले आहेÞ कंधार, मुखेडनंतर दिÞ २९ जून रोजी सकाळी बंडखोर आमदारांविरोधात जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वात हदगाव, हिमायतनगर मतदार संघात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून लक्ष वेधले.

तर बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकरी शिवसैनिकांच्या कामांचाही खोळंबा होऊ नये.
शिवसैनिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेÞ शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या नेतृत्वात नायगाव, देगलूर, मुखेड येथे तर जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वात भोकर, लोहा, कंधार येथे आंदोलन होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या