25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : तालुक्यातील सिरंजनी जिल्हा परिषद गटातील मौजे चिचोर्डी, महादापुर व सिबदरा या तीन ग्रामपंचायच्या ४ जागांसाठी ५ जूनला मतदान झाले होते. त्याचा निकाल सोमवार, दि. ६ जून रोजी जाहीर झाला. यात शिवसेनेच्या दोन, तर काँग्रेस व भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा विजय झाला.

चीचोर्डी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रं. २ मध्ये युवा सेना हदगाव-हिमायतनगर जिल्हा समन्वयक विशाल राठोड यांच्या गटातील वैशाली सीताराम देशमुखे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या पत्नी वनश्री परसराम ढाले निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात विशाल राठोड यांच्या गटाकडून शिवसेनेचे पुंडलिक छत्रपती भिसे यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारास ११0 मते मिळाली तर विरोधी गटाच्या उमेदवाराचा ४५ मतांनी पराभव झाला.

विशाल राठोड, शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, चिचोर्डी येथील गणपत वागतकरकांताराव वागतकर, विजय टारपे, संभाजी टारपे, सुरेश वागतकर, अनिल तरडे, धरतरी वागतकर, विलास वागतकर, विलास भिसे, दत्ता तरटे, रामदास भडंगे, अरविंद भडंगे आदींनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या