शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी येथील गाव लगत असलेल्या निर्मल रस्त्यावरील मुख्य पुलावर अनेक खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. प्रवाश्यांना याच खड्यातुन प्रवास करावा लागतो. कारण या खड्यामुळे पुलाची अक्षरशः चाळणी झाली आहे.तर वाहन धारकांना वाहन कोणता खडा हुकवावा हे कळेनासे झाले.एक खड्डा हुकवावा तर दुसऱ्या खड्यात जाऊन पडण्याची भीती वाटते.
काही खड्डे तर अक्षरशः जीवघेणा आहेत.तर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक सर्वत्र पाणी साचले आहे.तर वाहन धारकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.तर दुसरीकडे याच राज्य महामार्गावर मोठया प्रमाणात अवजड वाहने सह इतर वाहतूक वाढली आहे.
शिवणी ते दयाल धानोरा पर्यंत रस्त्याच्या बाजूला असणारे नाली भुईसपाट झाले आहे.या मुळे पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले माती व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वाहून जाऊन शेतीचे बांध फुटून जात आहे.तर काही ठिकाणी वरून रस्ता तर खालून बोगदा आहे.रस्त्याच्या बाजूला नाली नसल्याने वरच्या बाजूची माती सगळी मुख्य डांबरी रस्त्यावर येत आहे.
यावरून प्रवास करत असताना गाडी सायकल,दुचाकी चे आपघात होत आहे. एकंदरीत हा रस्ता प्रवाश्यांना अपघातास आमंत्रण देत आहे.या कडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रास दुर्लक्ष दिसून येत आहे.या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन या पुलावर असलेल्या खड्याची दुरुस्ती करावी व डांबरी रस्त्याच्या बाजूला नाली कडून पावसाच्या पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी शेतकऱ्यां कडून होत आहे. बांधकाम विभागाने डांबरी रस्त्याच्या बाजूला जर नाली नाही काढली तर शेतकरी आंदोलनाच्या भिमिकेत आहेत असे बोलले जात आहे.