18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडजानापुरीजवळ शिवशाही बस उलटली

जानापुरीजवळ शिवशाही बस उलटली

एकमत ऑनलाईन

नांदेड : महामंडळाच्या मुख्यबसस्थानकातून सोलापुरकडे निघालेली शिवशाही बस नांदेड-लातुर महामार्गावर जानापुरीजवळ उलटली. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजता झाला. यात १३ प्रवासी जखमी झाले असून ६ जणांना शासकीय रुग्णालयात तर ५ जणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्य महामंडळाच्या नांदेड बसस्थानकातुन शुक्रवारी रात्री ९.३० वाजता शिवशाही बस क्रमांक एमएच ०६ बी डब्लु ४३८१ ही प्रवासी घेऊन सोलापूरकडे जाण्यासाठी निघाली होती.रात्री १० च्या दरम्यान जानापुरी जवळ एका आयचर टेम्पोने साईड न दिल्यामुळे बस रस्त्यालगत एका बाजूने उलटली.या अपघातात एकुण १३ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सोनखेड ठाण्याचे एपीआय मांजरमकर व त्यांच्या सहका-र्यांनी घटनास्थळी भेट दिली. व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. तर नांदेड आगारातील अधिका-यांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताची माहिती घेत शासकीय रुग्णालयात जावून जखमींची विचारपुस करुन औषध उपचारासाठी मदत केली.

अपघातातील १३ प्रवासा पैकी ६ जणांना शासकीय तर ५ जणांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघांना उपचारा दरम्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय नियंत्रक माळी, नांदेड आगारप्रमुख व्यव्हारे, वाहतुक नियंत्रक सुरेश पवार, फुलारी यांनी दिली आहे.घटने बाबत सोनखेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून एस.टी.महामंडळाकडुन तक्रार देण्याची प्रक्रीया सुरु होती. घटनेतील आयचर टेम्पो चालकाच्या निसकाळजीपणामुळे अपघात घडला असे एसटी बस चालकांने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या