37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडबंद असलेली मंदिरे उघडण्या साठी कंधार मध्ये भाजपाचे लक्षणिक उपोषण

बंद असलेली मंदिरे उघडण्या साठी कंधार मध्ये भाजपाचे लक्षणिक उपोषण

एकमत ऑनलाईन

कंधार : अनलॉक 3 चालु झाले असून थोड्या थोड्या प्रमाणात ताळेबंदी उघडण्यात आली आहेत. मोठे व्यवसाय माँल, व्यापारी संकुलन, वाहातुक, प्रवासी वाहतूक ,बार ,दारुचे दुकान उघडले आसुन महाराष्ट्र सरकारने अद्याप एकही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही,त्या साठी भाजपा कंधार च्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

साधु संताचा महाराष्ट्र म्हणून ओळख असुन महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे. मोठ मोठी मंदिरे व साधु संतांची मठ आहेत. सर्व थोड्या थोड्या प्रमाणात सुरू करण्यात राज्य सरकारने परवानगी दीली आहे परंतु मंदिर उघडण्या बाबद अजुन राज्य सरकारने निर्णय घेतला नाही.

महाराष्ट्रतील मंदीरे चालु करावी यासाठी दि 13 रोजी भाजपा कंधार च्या वतीने हनुमान मंदिर छ.शिवाजी महाराज चौक कंधार येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले व मा. तहसीलदार कंधार यांना निवेदन देण्यात आले यात भाजप चे ता.अध्यक्ष भगवान राठोड भाजप चे शहर अध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार ,धोडीबा भायगावे, संभाजी घुगे, राजु केंद्रे , राजु लाडेकर , एस.पी.जाधव, श्याम शिंदे, मधुकर डांगे ,चेतन केंद्रे , बालाजी तोटावाड, राजहंस शहखपुरे, शंतनू कैलासे, साईनाथ कोडगीरे, सय्यद नवाज, कैलास नवघरे, अविनाश गित्ते , अँड.सागर डोंगरजकर, किशनराव गित्ते, राम टोकलवाड, पंडित ढगे, प्रविन बनसोडे आदी उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित आज साहित्यांनद प्रतिष्ठानचे ऑनलाईन कवीसंमेलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या