22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडदेश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान : कर्नल रंगाराव

देश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान : कर्नल रंगाराव

एकमत ऑनलाईन

नांदेड : देशाच्या सेवेमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमासमवेत देश सेवेचे, स्वरंक्षणाचे, देश रक्षणाचे धडे देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय छात्र सेनेने केले आहे. देशसेवेचे व्रत अंगीकारून राष्ट्रीय छात्र सेनेचे युवक भारतीय सैन्यात, पोलीस राज्य राखीव दलात, केद्रीय राखीव दलात चांगली भूमिका व कर्तव्य बजावत असल्याचे गौरवोद्गार कर्नल एम रंगाराव यांनी काढले.

महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेड यांच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रांगणात राष्ट्र छात्रसैनिकां करिता वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ५२ महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे कमांडिंग अधिकारी कर्नल एम रंगाराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनसीसी प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल वेत्रिवेलू एस उपस्थित होते.

या शिबिरात हिंगोली, परभणी वनांदेड जिल्ह्यातील ४५० एनसीसी विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. दिनांक १२ ते २१ जून या दहा दिवसाच्या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ उध्दव भोसले व क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांच्या संयुक्तप्रयत्नाने प्रशिक्षणार्थींना भव्य विद्यापीठ प्रांगणात प्रशिक्षणाचालाभ घेण्याचे भाग्य लाभले आहे असे मनोगत याप्रसंगी कमान अधिकारी यांनी व्यक्त केले.

या शिबिरात छात्र सैनिकांना
ड्रील, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन , अंबुश, पेट्रोलयासोबत आपातकालीन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा या विविध विषयासह भारतीय सैन्याचा इतिहास याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरार्थी यांना सैन्य प्रशिक्षण हेतू फायरिंग सराव व स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांकरिता अल्पोहार व भोजन यांची व्यवस्था एन सी सी निदेशालय , बटालियनच्या वतीने करण्यात आलेली आहे.

या शिबिराचे प्रशिक्षण शिस्तबद्धव वेळेनुसार करण्यासाठी ५२ महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग एम रंगाराव, प्रशासकीय ऑफिसर ले. कर्नल वेत्रिवेलू एसयांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी मेजर पंढरीनाथ घुगे, सुभेदार मेजर ललित मेहता, लेफ्टनंट बालाजीठाकूर, लेफ्टनंट काजी सय्यद लेफ्टनंट विजयकुमार देशमुख सेकंड ऑफिसर मुनेश्वर,फर्स्ट ऑफिसर सवडतकर अनिल, थर्ड ऑफिसर रघुनाथ राठोड, थर्ड ऑफिसर प्रताप केंद्रे, सुभेदार गोपाल सिंग, सुभेदार जमनसिंग, सुभेदार गोपाल सिंगसुभेदार लाल मोहम्मद, बी एच एम सुनील कुमार, हवालदार अरविंद कुमार, हवालदार संजय, हवालदार संदीप, हवालदार सिद्धाप्पा, शेख अन्सारी, पवार राजू , विठ्ठल गवळी आदी परिश्रम घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या