29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeनांदेडपोलिस दलातील सहा अंमलदार सेवानिवृत्त

पोलिस दलातील सहा अंमलदार सेवानिवृत्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस अंमलदार वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून दि.२८ रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सहकुटूंब सत्कार करण्यात आला. नियत वयोमानानुसार जिल्हा पोलिस दलातील सपोउपनि अन्वर इकबाल शेख अमीर लतीफ इस्लापुर पोलिस ठाणे, सपोउपनि अशोक बळीराम भिसे पोलिस मुख्यालय, सपोउपनि ओमदेव शिरू जुगनाके किनवट पोलिस ठाणे, पोहेकॉ प्रकाश देविदास देशमुख लिंबगाव पोलिस ठाणे, पोहेकॉ लक्ष्मीकांत गंगाधर चारतवाड मुखेड पोलिस ठाणे व पोहेकॉ शेख शब्बीर हुसेन साब मरखेल पोलिस ठाणे हे सहाजन दि.२८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले.

त्यांच्या निवृत्तीबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्तांना पुढचे जीवन सुखी आणि समाधानाने जगण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास पोनि अनिल चोरमुले, सपोनि शिवाजी लष्करे, सपोनि कमल शिंदे, यासह पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सुत्रसंचालन सपोउपनि विठ्ठल कत्ते, आभार पोनि चोरमुले यांनी मानले. पोकॉ राखी कसबे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या