31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडचाकूचा धाक दाखवून सहा तोळे सोने लंपास

चाकूचा धाक दाखवून सहा तोळे सोने लंपास

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : सामसुम झालेल्या वेळेचा फायदा घेत अज्ञात तिन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत एका महीलेच्या गळ्यांतील सहा तोळ्याच्या सोन्याची (पोत) हार हिसकावुन घेऊन पळत असताना घरातील पुरूषाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्या पुरूषावर चोरट्यांनी चाकुणे वार करून पळून गेल्याची घटना नरसी येथील रेस्ट हाऊसच्या बाजुला शनिवारी रात्री नऊ वाजता घडली.दरम्यान या घटनेत बच्चेवार यांना बारा टाके बसले असून त्या हार मधील तीन तोळे सोने चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नरसी – बिलोली रोडवर शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या कनया दिगांबर बच्चेवार यांचे तीन मजली इमारत आहे.दि.१० एप्रिल शनिवार रोजी रात्री नऊ वाजता अज्ञात तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील गिताबाई भारती यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची पोत तोडून पळत असताना घर मालक कनया दिगांबर बच्चेवार यांनी पाहीले.त्या चोरट्यास पकडले तेव्हा चोरट्यांनी कनया बच्चेवार यांच्या हातावर चाकुने वार केले.चोरट्यांत व बच्चेवार यांच्या झालेल्या झटामुटीत सहा तोळ्याची असलेल्या सोन्याच्या पोती पैक्षा तीन तोळे सोने घेऊन चाकु जागेवर सोडून चोरटे पळून गेले.

आरडाओरडा केल्याने बाजुचे काही नागरीक येऊन जखमी कनया बच्चेवार यांना दवाखान्यात नेले बच्चेवार यांच्या हाताला बारा टाके बसले असुन जागेवर ब-यांच प्रमाणात रक्त पडले होते. या बाबत कनया बच्चेवार यांनी दिलेल्या फियार्दी वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ.सिद्धेश्र्वर धुमाळ व स.पो. नि.पुरी यांनी भेट दिली आहे.तत्कालीन स.पो.नि.सोमनाथ शिंदे हे असताना एका व्यापा-यांला रस्त्यावर अडवून मोठी रक्कम लुटल्याची घटना घडली होती.शिंदे यांनी नागरिकांना घेऊन दिड तासात चोरट्यांना पकडले होते.स.पो.नि.शिंदे यांच्या काळात गुन्हेगारांवर वचक होती.त्यांची बदली होऊन दोन महीने झाले.

गेल्या एक दिड महीण्यापूर्वी पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिका-यांच्या आशीर्वादाने तोडी आदेशाने आलेले स.पो.नि.महादेव पुरी हे निवळ आर्थिक व्यवहाराकडे जास्तीचे लक्ष देत असल्याचे दिसुन येत आहे.त्यांना नुकतेच पोलीस चौकीत कर्तव्यावर आलेल्या एका पोलीस कर्मचा-यांने खत पाणी टाकत जणू ठाण्याचा अर्धा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन लाकडाऊन काळात कोणाचे दुकान उघडे दिसले की अशा व्यापा-यांना आणुन चेरीमेरी घेऊन त्यांना सोडून देण्याचा उद्योग चालवला आहे.सध्या रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या कारभार ढेपाळला असुन या ठाण्याला एका कर्तव्य दक्ष अधिकारी गरज आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे.

दरम्यान सदरची घटना ही लवकरच म्हणजे रात्री नऊच्या सुमारास घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून चोरट्यांचे मनोबल कसे वाढले…. त्यांनी सकाळपासूनच चोरी करण्याच्या दृष्टीने पाळत ठेवली होती का ? जर ठेवली असेल तर अनोळखी व्यक्ती गल्लीबोळात किंवा चौकात फिरत असताना त्यांना कोणी पाहिले नाही का ? अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.भर वस्तीत झालेल्या चोरी व चाकूहल्ला प्रकरणाने नरसीतील नागरिक भयभीत झाले असून या चोरट्यांनी एवढे धाडस दाखवून केलेल्या कारनाम्यामुळे रामतीर्थ पोलिसांसमोर एक आव्हानच उभे केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस तपासाची चक्रे फिरवून त्वरित या प्रकरणाचा छडा लावतील की ? ये रे माज्या मागच्या अशी परिस्थिती निर्माण होऊन चोरीचा तपास जैसे थे राहील हे येणा-ाा काळात कळेलच.

बस्स झाले आता…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या