26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडपेट्रोलपंप चालकास लुटणारे सहाजण जेरबंद

पेट्रोलपंप चालकास लुटणारे सहाजण जेरबंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : अर्धापूर शिवारात जांबरुन पाटीजवळ दि़२५ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीतांनी पेट्रोल पंप चालकास आडवुन खंजरने मारहाण करुन त्यांचेकडील नगदी रोकड लंपास केल्याची घटना घडली होती़ अखेर याप्रकरणातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, पथकाने दि़२३ रोजी सहा आरोपींना जेरबंद केले आहे़

मागच्या मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यात जबरी चो-या करणारी टोळी सक्रीय झाली होती़ रस्त्याने जाणा-या वाटसरूंना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते़ दरम्यान दि़२५ ऑगस्ट रोजीही अर्धापुरजवळ ऐका पेट्रालपंप चालकास लुटल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी अर्धापुर पोलीस ठाण्यात गुरनं २५०/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी फरार होते़ या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थागुशाला आदेशीत केले होते.त्यावरून आरोपीचा शोध घेण्याचे काम चालु होते़ दरम्यान दि़२३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोनि व्दारकादास चिखलीकर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, अर्धापुर शिवारातील पेट्रोलपंप चालकास आडवुन लुटमार करणारे आरोपीपैकी एक आरोपी खडकपुरा येथे आहे. या माहितीवरुन स्थागुशा पोनि चिखलीकर यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशाचे सपोनि घेवारे व अमलदार यांना सदर ठिकाणी रवाना केले.

पथकाने सापळा रचुन सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी शेख शाहरुख ऊर्फ घोलेवाला शेख इकबाल (वय २२, रा. खडकपुरा,नांदेड) यास खडकपुरा येथून ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल त्याने करुन त्याचेसोबत इतर शेख हैदर ऊर्फ हैद शेख शौकत (वय २१, रा़ खडकपुरा), अकरमखान ऊर्फ मुशरु अयुबखान पठाण (वय २० रा. समीराबाग,नांदेड), शेख जावेद ऊर्फ सज्जु शेख चांद (वय २६ रा. धनगरगल्ली अर्धापुर), अब्दुल जाबेर अब्दुल सादुला (वय ३०, रा़आगापुरा गल्ली, अर्धापुर) व एक विधीसंघर्षीत बालक रा. विसावानगर असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर स्था.गु. शा.चे पथकाने सर्व सहा आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी १ लाख रुपये व गुन्हयात वापरलेली दुचाकी, ऑटो व मोबाईल असा एकुण ४ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. सर्व आरोपीना पुढील तपासकामी अर्धापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे़

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या