23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडदयाल धानोरा येथील वन महामंडळाच्या जंगलात अवैध सागवानाची तस्करी

दयाल धानोरा येथील वन महामंडळाच्या जंगलात अवैध सागवानाची तस्करी

एकमत ऑनलाईन

शिवणी (प्रकाश कार्लेवाड) : किनवट तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणा-्या वनविकास महामंडळा च्या राखीव जंगलाच्या दयाल धानोरा तांडा येथील बिट क्र.२७२ मधील दि.२४ जुलै रोजी रात्रीला शिवणी निर्मल रस्त्याचा बाजूची मौल्यवान सागवणाची ८ सजीव झाडांची मशीन द्वारे कत्तल करून तस्करी सागवान लाकूड घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शिवणी येथील दयाल धानोरा तांडा गावलगत असलेल्या रस्त्याच्या बाजूला सागवान झाडांची कत्तल करण्यात आलेली त्याची झाडांची किंमत १५६०० रुपयांची दाखवली जाते.याचे पी.ओ.आर.६/३९१ गुन्ह्याची नोंद करण्यात आली.तर या संदर्भात विभागीय व्यवस्थापक शंभरकर सहायक व्यवस्थापक जे.डी.पराड,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.पटवेकर वनपाल,एन.एस.वाघमारे,के.पी.केंद्र,बी.एस.वडजे,व्ही. ए. मोरे.के.एम.वाट,वनमजुर, नागोराव मेंढके,सुभाष कोरेवाड,आदी कर्मच-्यांनी कार्यवाही केली.अशी घटना मागील काही दिवसात याच वनपरिक्षेत्र मंडळातील कंचली येथे ही झाडांची कत्तल करण्यात आली होती.

मागील एकच महिन्यात ही दुसरी घटना झाल्याने या भागातील येणा-्या काळात वन जंगल तुटून भुई सपाट होईल अशी मत व्यक्त केले जात आहे.तर काल झालेल्या घटने संबधी दयाल धानोरा तांडा येथील नागरिकांनी रोष व्यक्त केले आहे.तर या प्रकरणात संबंधित कर्मचारयांची हात मिळवणी असल्याची बोलले जात आहे.तर या प्रकरणाची गांमभियार्ने दखल घेऊन वरीष्ठ अधिका-्यांनी रात्रीच्या गस्ती साठी वाहनांची व्यवस्था करून देण्यात यावी.व या भागात जे मौल्यवान सागवाणाची तूट होत आहे.याला आळा बसेल असे स्थानिक व या शिवणी वन परिक्षेत्र मंडळातील वन्यप्रेमी कडून बोलले जात आहे.

विस दिवसा पूर्वी यांच्या कार्यक्षेत्रातील कंचली येथील राखीव जंगलातील १२ सागवान झाडाची अवैध तोड करून अंदाजे तीस हजार रुपये मालाची तस्करी केली होती. एकाच महिण्यात दोन वेळा तस्करांनी तोड केल्याने वन विकास महामंडळामध्ये खळबळ उडाली आहे. वनविकास महामंडळाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे व वन कर्मचा-यांच्या बेफिकीर वृतीमुळे या परिसरात अवैध जंगल तोडीचे प्रमाण वाढले आहे. दयाल धानोरा या परिसरात बेछुट झाडांची कत्तल होत असून मौल्यवान सागवानाची तस्करी केल्या जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून परिसरातील नागरिकांकडून तस्कराविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.

भारतमाला योजनेतील अक्कलकोट ते सोलापूर रस्ता ८४% पूर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या