Thursday, September 28, 2023

तर ठेचण्याचे काम करावे लागणार

नांदेड : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते तथा आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र याचवेळी बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी विरोधकांना थेट ठेचण्याची भाषा केली.

सोशल मीडियावरुन आपल्यावर टीका करणा-यांना ठेचण्याचे काम करावे लागणार असल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकना शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर त्याने हे वक्तव्य केले.

नांदेड येथे शनिवारी शिवसेनेचा (शिंदे गट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना संतोष बांगर म्हणाले की, फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कोणी जर आपल्याला बोलत असेल, तर त्याला तिथल्या तिथे ठेचण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान याचवेळी बोलताना संतोष बांगर यांनी शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख बबन थोरात यांचावर तोफ डागली आहे. जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना ५ तोळ्याची चैन द्यावी लागते, तसेच विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षीस देखील मी दिले असल्याचा आरोप बांगर यांनी केला. तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते. त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका, खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचे काम केले असल्याचा आरोप बांगर यांनी केले. तसेच जे लोक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, ते सुद्धा आपल्याकडे येतील असे देखील संतोष बांगर म्हणाले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या