24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेड'तर' मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती

‘तर’ मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण अतिशय मजबूत होते. परंतु केवळ व्यक्तीद्वेष डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणा-या सध्याच्या आघाडी सरकारने आरक्षणाची बाजू पाहिजे तेवढ्या प्रभावीपणे सर्वोच्च न्यायालयात मांडली नसून आरक्षण उपसमीतीच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. असे प्रतिपादन भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मालेगाव येथे बोलताना केले.

मालेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्याचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मराज देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख हाट्टेकर, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेशभाऊ देशमुख, भाजपा शहर सरचिटणीस व्यंकटराव मोकले, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष क्षीरसागर, बालाजी स्वामी, सुधाकर पाटील कदम, शहराध्यक्ष विलास साबळे, तालुका सरचिटणीस अवधूतराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मालेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ. लक्ष्मणराव इंगोले यांनी प्रास्ताविकपर भाषणातून सोसायटीच्या अर्थिक परिस्थितीची माहिती देऊन तोट्यात असलेल्या सोसायटीच्या बिकट परिस्थितीवर मात करून संचालक मंडळाच्या सहकायार्ने सोसायटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. याच उत्पन्नातून सोसायटीच्या मालकीचे दोन नविन व्यापारी गाळे बांधण्यात आले. तर या पूवीर्सुध्दा अशाच प्रकारे सात व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत. एकूणच ही सोसायटीच्या फायद्यात असल्याचे सांगून नविन सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण्याची परवानगी जिल्हा सहकारी बँकेने द्यावी अशी मागणी केली. तर भगवानराव पाटील आलेगाकर आणि डॉ. सुनिल कदम यांनी सहकारी संस्था या शेतक-यांच्या जीवनदायीनी असून त्या टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सभासदांनी सुध्दा शेतक-यांचे हित जोपासून निस्वार्थपणे काम करणा-या व्यक्तींच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजेवार यांनी केले. तर व्हाईस चेअरमन चन्नाप्पा दिग्रसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वेळी जिल्हा निबंधक कार्यालयाचे कर्मचारी किशन गव्हाणे, भाजपा ओ. बी. सी. मोर्चा प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, सदाशिव देशमुख, बालाजी मरकुंदे, राजाभाऊ राजेवार, व्हाईस चेअरमन चन्नाप्पा दिग्रसे, तालुका निबंधक ए. आर. चौहान, सह्यायक निबंधक संजय जळके, मगनाळे, माजी जि. प. सदस्य रामराव भालेराव, संतोष मुंगल, अमोल कपाटे, उध्दव कदम, कृष्णा पाटील इंगोले, विलास इंगोले, सुभाष बुट्टे, लक्ष्मण राजेवार, दिगंबर इंगोले, त्र्यंबक कदम, बाळू खुदार्मोजे, विनोद अटकोरे, साहेबराव साखरे, दगडू इंगोले, श्रीमती सारजाबाई नानाराव इंगोले आदींची उपस्थिती होती.

कोरोनाचा संसर्ग सुरूच, महाराष्ट्राने रशियालाही मागे टाकले !

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या