27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडकिनवट-माहूर विधानसभा क्षेत्र विकास कामांचे लवकरच भूमिपूजन

किनवट-माहूर विधानसभा क्षेत्र विकास कामांचे लवकरच भूमिपूजन

एकमत ऑनलाईन

किनवट : किनवट/माहूर विधानसभा क्षेत्र हा दुर्गम व आदिवासी बहूल असल्याने विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि विकासाचे जाण असलेले आमदार भिमराव केराम यांनी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून घेतल्याने मागील १५ वर्षापासुन कोठारी, शनिवारपेठ रस्त्याचे मजबूतीकरण व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी २४ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला असून लवकरच या कामाचे भूमीपूजन होणार असल्याचे माहिती भाजपा नेते अनिल तिरमनवार यांनी दिली.

आमदार भिमराव केराम यांनी किनवट/माहूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोटयवधी रूपयाचा निधी आणल्याची तिरमनवार यांनी सांगून ते पुढे म्हणाले किनवट, घोगरवाडी, कोसाई, आदिलाबाद या मार्गावरील तेलंगाणा राज्याला जोडणारा ५ कि.मी. घाटाचे काम पुर्णत्वाकडे आले असून या मार्गाचा लोकार्पण लवकरच केला जाणार आहे. अतिदुर्गम भागातील पिंपळशेंडा रस्यासूचे काम अनेक वर्षापासून प्रलंबीत होते येथील नागरीकांनी या रस्याशेसाठी विविध आंदोलने केली.

आणी आता या रस्यााडसाठी ४ कोटी ५० लक्ष रूपये निधी प्राप्त् झाला असून कामालाही प्रारंभ झाला आहे. किनवट, माहूर, उनकेर्श्व येथील पैनगंगा नदीवरून उच्च पातळीचे बंधा-याचे काम मागील काही वर्षापासुन काम रखडले होते आमदार भिमराव केराम यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि राज्य् शासनाकडे पाठपुरावा करून या बंधा-याचे प्रशासकीय मान्यता मिळायचे असून लवकरच या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहे. सारखणी, मिनकी, वडोली पाझरतलावालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदार स्थानिक निधीतून तालुक्यातील काही गावात सभामंडप व विविध समाज उपयोगी कामासाठी ५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. तर मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत किनवट/माहूर तालुक्यात ५० कोटी रूपये खर्च करून रस्ते विकासाचे कामास मंजूरी मिळाली आहे. किनवट/माहूर तालुक्यातील कर्मचा-यांच्या निवास बांधकाम व कार्यालयासाठी २५ कोटी प्राप्त् झाले आहे. माहूर येथे महसूल कर्मचा-यासाठी १५ कोटी रूपयाची निवास बांधकाम तसेच तलाठी कार्यालयासाठी ७ कोटी असा भव्य् निधी प्राप्त् झाला असून श्रीक्षेत्र माहूर जवळील पैनगंगा नदीवर भाविकांना स्रानासाठी घाटही बांधण्यासाठी निधी प्राप्त् झाला असून वरील सर्वकामे दर्जेदार पध्दतीने होण्यासाठी आमदार भिमराव केराम हे प्रयत्नशील असल्याचे अनिल तिरमनवार यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या