16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडगोकुंद्याच्या आश्रम शाळेत सोयाबीनच्या ढिग

गोकुंद्याच्या आश्रम शाळेत सोयाबीनच्या ढिग

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर: सहस्रकुंड येथील शासकिय आश्रम शाळेच्या हाँल मध्ये या शाळेचे मुख्याध्यापक यांचे मेहुणे यांनी सोयाबीन वाळु घातल्याचा प्रकार उघडकीस आला असुन याच शाळेतील दुसया हाँल मध्ये जनावरे कोंढत असल्याचा प्रकार देखील उघडकीस आले आहे.या प्रकरणी किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी माल सिल करुन माल जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

सहस्रकुंड येथील शासकिय आश्रम शाळेच्या एका हॉलमध्ये सोयाबीन वाळु घातल्याचा प्रकार गावकयांनी सहस्रकुंड येथील कार्यकर्ते सतिश वाळकिकर यांना कळवताच त्यांनी सहस्रकुंड येथील अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या अधिकायांना या बाबत माहीती देताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेवुन सदरिल प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी केली. व या प्रकारा बाबत किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांना माहिती दिली. असता याबाबत माल जप्त करुन पंचनामा करुन माल सिल करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी किरण जोशी यांना देताच सदरिल माल पंचनामा करुन सिल केले आहे.

या बाबत जबाबदार असलेल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर.एस.जेकीलवाड,शाळा अधिक्षक यु.बि.पवार यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी सहस्रकुंड येथील कार्यकर्ते सतिश वाळकिकर यांनी केली आहे.सहस्रकुंड येथील आश्रम शाळेतील या प्रकारा बाबत प्रकल्प कार्यालयाकडून काय कारवाई होईल याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या