24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडासृष्टी पाटील -जोगदंडची आंतरराष्ट्रीय विशेष प्रशिक्षणासाठी निवड; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सृष्टी पाटील -जोगदंडची आंतरराष्ट्रीय विशेष प्रशिक्षणासाठी निवड; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

एकमत ऑनलाईन

नांदेड : जागतिक धनुर्विद्या स्पर्धा व पॅरिस ( फ्रान्स) येथे आयोजित २०२४ च्या ऑलम्पिक तयारीसाठी दक्षिण कोरिया येथे विशेष धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिरासाठी नांदेडची कु.सृष्टी बालाजी पाटील जोगदंडची निवड झाली आहे.

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान सोनीपत (साई ) हरयाना येथे आयोजित निवड चाचणीत ज्युनिअर वयोगटात मराठवाडा एक्सप्रेस नावाने ओळखली जाणारी नांदेडची धनुर्विद्येची सुवर्ण कन्याकुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड हीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत पुढील महिन्यात दक्षिण कोरिया येथे होणा-या अ‍ॅडव्हॉन्स प्रशिक्षण शिबिरात भारतीय धनुर्विद्या संघात आपली निवड कायम केली आहे.

निवड प्रक्रीयेत सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत कु. सृष्टीला निवड झाल्याबद्दल खासदार तथा जिल्हा संघटना अध्यक्ष हेमंत पाटील, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार तुषार राठोड, महापौर जयश्रीताई पावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल, अतिरीक्त पोलिस महासंचालक फत्तेसिंग पाटील, भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर, ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर, ब्रिजेशकुमार, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी

, महिला बाल कल्याण सभापती अपर्णाताई नेरळकर, रेखाताई चव्हाण, संजय उदावंत, संपादक श्याम कांबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, डॉ. हंसराज वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरुदिपंिसघ संधु, प्रवीण कोंडेकर ,राज्य क्रीडा मार्गदर्शक   शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, स्टेडियम व्यवस्थापक तथा उपायुक्त रमेश चवरे, नांदेड ऑलम्पिक संघटना अध्यक्ष रमेश पारे, उपाध्यक्ष जनार्दन गुपीले राज्य धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदासरण दिवे अभिजीत दळवी, श्री. गायकवाड आदीनी शुभेच्छा दिल्या.

अतिशय लहान वयापासूनच तीची आई तथा राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंडच्या मार्गदर्शनाखाली ऑंिलपिकचे ध्येय उराशी बाळगत होय मला ऑलम्पिक मध्ये देशासाठी पदक मिळवायचे आहे असा चंग मनाशी बांधलेला आहे. कु. सृष्टी ही निवड प्रक्रियेत २५५१ गुण मिळवीत तिसरी तर एलिमिनेशन राऊंडमध्ये आपला दबदबा कायम ठेवत राऊंड रॉबिनमध्ये ही आपले तिसरे स्थान कायम ठेवीत ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरिया येथे आयोजित अ‍ॅडव्हॉन्सस ट्रेनिग कॅम्पसाठी भारतीय धनुर्विद्या संघात आपली निवड कायम केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या