19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeनांदेडपुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली; तीघांची जलसमाधी तर दोघे सुखरूप

पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली; तीघांची जलसमाधी तर दोघे सुखरूप

एकमत ऑनलाईन

नांदेड : गुलाबी चक्री वादळामुळे सध्या जोरदार पाऊस सुरु आहे़यामुळे नदी,नाले तुंडूब भरून वाहत असून महामंडळाच्या एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे.उमरखेडजवळ असलेल्या एका नाल्यावरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत तीघांना जलसमाधी मिळाली तर २ जणांना सुखरूप वाचविणत आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,महामंडळाच्या नागपूर आगाराची एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ५०१८ ही सोमवारी नांदेड मुक्कामी होती़आज मंगळवारी सकाळी पाच ते साडे पाचच्या सुमारास ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती. सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. मात्र, त्यावेळीच बस पुराच्या पाण्यात वाहून गेली.

बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुलाबी चक्री वादळामुळे दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे. उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता. यामध्ये बस वाहून गेली आहे. या बसमध्ये पाच जण होते. दोन प्रवाशांना वाचवण्यात यश असून तीन मृतदेह मिळाले. आहे. घटनास्थळापासून ५० मीटरवर बस आढळल्याची माहिती यवतमाळचे प्रभारी विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या