23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home नांदेड देगलुरात मुद्रांक विक्री चढ्या दराने

देगलुरात मुद्रांक विक्री चढ्या दराने

देगलूर : बँकेतील कर्ज काढणे, बेबाकी शपथ पत्र व हक्क सोड नोंदणी आधी कामासाठी लागणा-या मुद्रांकाची विक्रेत्याकडून साठेबाजी करून वाढीव दराने त्याची विक्री केली जात आहे. विक्रेत्याकडून सुरू असलेल्या या काळया बाजाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांमधून होत आहे.

मुद्रांक विक्रेत्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तीन टक्के कमिशन मिळते. असे असतानाही काही विकृती ग्राहकाकडून मूळ किमतीच्या ३० ते ४० टक्के रक्कम घेत आहेत. यात विक्रेत्यांची कमाईही ३० ते ५०टक्क्यापर्यंत जात असून हा प्रकार सर्रास सुरू आहे सध्या जगभरात कोरोनाविषाणूने थैमान घातली आहे. यातच मध्यंतरी देगलूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आलेले आहे.

सध्या अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेच्या दारात उभी आहेत. परंतु बँकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी १०० रुपयाचा बॉंड पेपर असणे आवश्यक आहे. हीच शेतक-यांची गरज ओळखून देगलूर शहरातील अनेक मुद्रांक विक्रेते यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे यावर नियंत्रण ठेवण्यास शासकीय अधिकारी कर्मचारीवर्ग अपयशी ठरल्याचे दिसून येत असल्याची चर्चा शेतक-यांमध्ये सुरू आहे.

Read More  जिल्ह्यात दूध उत्पादकांचा एल्गार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow