लोहा : प्रतिनिधी
लोहा शहरात बसणा-या छत्रपती शिवरांयांच्या पुतळयाचे सर्व श्रेय लोहा नपाचे नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांना जाते असे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. गेली अपेक वर्षापासुन लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याचे स्वप्न आज दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीच्या शुभमुर्हूतावर होणार आहे.
सोन्याची उगवली सकाळ लोहयात छत्रपती शिवरांयांच्या अश्वरुढ पुतळा बसविण्याचे स्वप्न पुर्ण होणार या प्रमाणे लोहा .पा.च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांचे पदसिध्द अध्यक्ष तथा लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी असुन त्यांच्या अथक प्रयत्नामुळे व लोहा न.पा.च्या सर्व सन्माननीय सदस्य, मुख्याधिकारी, शहरवासिय यांच्या सततच्या पाढपुराव्यामुळे अखेर लोहा वासियांची मागणी अखेर पुर्ण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य सुंदर व आकर्षक अश्वरुढ पुतळा लोहा न.पा.ने मुंबई येथून टेंउर प्रकियेने खरेदी करुन मुंबई -पुणे -लातूर- अहमदपूर मार्गे लोहा शहरात आयचर टेम्पोने आणण्यात आला . योवळी छत्रपती शिवरांयाच्या या अश्वरुढ पुतळा हा लोहा अहमदपूर तालुक्यांची सिमा असलेल्या श्री क्षेत्र माळेगांच्या पावन भूमीत आगमण झाले यावेळी माळेगाव ते लोहा शिवरांयाच्या अश्वरुढ पुतळा आयचरने आणताना माळेगांव , लांडगेवाडी,माळाकोळी, खेडकरवाडी, पोलेवाडी आदी ठिक ठिकाणी छत्रपती शिवरांयांचे ढोलताशा पुष्पहाराने फुलांची उधळण करीत फटाक्याची अतिषवाजी करुन जोरदारपणी स्वागत करण्यात आले.
तर लोहा शहर ही छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळयाचे स्वागत करण्यासाठी बॅनर बाजी कमानी आदीने समले होते .तसेच लोहा शहरात ठिकठिकाणी अनेक मान्यवरांनी शिवप्रेमी जनतेनी पुष्पहारांनी उधळून जोरदार पणे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. तसेच माळेगाव ते लोहा छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळयाची भव्य मोटार सायकल व कारची रॅली काढण्यात आली.
यावेळी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर ,युवानेते प्रविण पाटील चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिताताई देवरे, नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, उपाध्यक्ष दत्ता वाले, ज्येष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, ज्येष्ठ नगरसेवक केशवराव मुकदम जेष्ठ नगरसेवक छत्रपती दादा धुतमल गटनेते करीम शेख, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक जिवन पाटील चव्हाण नगरसेवक नारायण यलरवाड नगरसेवक भास्कर पाटील पवार नबी शेख, संदिप दमकोंडवार, अमोल व्यवहारे यांच्या सहीत सर्व नगरसेवक मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड यांच्या सहीत कर्मचारी सर्व संघटनेचे प्रमुख नेते हजारोच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थीत होते.