नांदेड : स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरटयाला पकडून त्याच्याकडून १० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, इतवारा हद्दीतून दोन, वजिराबाद हद्दीतून दोन आणि नायगाव हद्दीतून एक अशा ९ दुचाकी गाड्यांच्या नोंदी आहेत. तसेच एक दुचाकीची नोंद अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, भानुदास वडजे, पोलिस अंमलदार मारोती तेलंगे, मोतीराम जाधव, तानाजी येळगे, संग्राम केंद्रे, गुंडेराव कर्ले, हनुमानसिंह ठाकूर, बालाजी तेलंग यांनी मुळ रा.शेलगाव ता.लोहा पण ह.मु.नरसीतांडा येथील शंभू उर्फ बाळू नारायण गिरी (३४) यास ताब्या घेतले. त्याने एकूण १० दुचाकी गाड्या ज्या चोरून ठेवल्या होत्या.
त्या पोलिसांना काढून दिल्या आहेत. शंभू उर्फ बाळू नारायण गिरीने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार, इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन, वजिराबाद हद्दीतून दोन, नायगाव हद्दीतून एक आणि एक चोरीची नोंद नसलेली दुचाकी अशा १० गाड्या स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केल्या आहेत. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.