27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडनांदेड रेल्वे स्थानकावर उग्र वासाचे रसायन जप्त!

नांदेड रेल्वे स्थानकावर उग्र वासाचे रसायन जप्त!

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकावर एका संशयीत व्यक्तीकडून उग्र वासाचे सहा किलो रसायन जप्त करण्यात आले. रेल्वे पोलिसांना हे रसायन आरडीक्स पदार्थ असावा अशी शंका आल्याने पोलिस अधिका-यांसह दहशतवादी विरोधी, बॉम्ब शोधक व नाशक पथकास घटनास्थळी धावपळ करावी लागली. या सर्व प्रकरणाची रविवारी दिवसभर चौकशी चालु होता. हे रसायन फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.आरोपीचा जबाब,राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व फॉरेन्सीक लॅबची माहिती यावरून हे रसायन ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.परंतू फॉरेन्सीक लॅबचा लेखी अहवाल येणे बाकी आहे.यानंतर सदर रसायन नेमके काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.तर संशयीत आरोपीस दि.६ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे,असे रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून माहिती अशी की, हुजूर साहिब रेल्वेस्थानकावर शनिवार दि.१ मे पीएसआय यलगुलवार हे आपल्या सहका-यांसह रात्रीची गस्त घालत होते. ते वेटींग रुमजवळ येताच त्यांना झोललेल्या एक संशयीताकडे बॅग दिसून आली.पोलिसांनी त्याला झोपेतून उठवले.तेव्हा तो नशेत होता. त्याची विचारपूस केली असता त्याची बोबडी वळली. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. ठाण्यात बॅगची तपासणी केली असता त्यात उग्र वासाचे रसायन दिसून आले. या पदार्थाबद्दल विचारणा केली असता संबंधीत व्यक्ती पोलिसांना उडवाउडीचे उत्तरे देऊ लागला. प्राथमीक चौकशीत हे रसायन जप्त करून त्याची तपासणी केली असता बॉम्बसदृष्य वस्तु बनविण्याचे रसायन आरडीएक्स आहे की काय असा अंदाज पोलिसांनी बांधला.

घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैभव कुलमुले, नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना कळविली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे जगदीश भंडरवार यांच्यासह दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांनीही धाव घेतली. रेल्वेस्थानक परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.रविवार दि.२ मे रोजी दिवसभर पोलिसांकडून संशयीताची कसुन चौकशी सुरू होती.यानंतर जप्त करण्यात आलेले रसायन नांदेड फॉरेन्सिक लॅब येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. सोमवारीही विविध विविध प्रकारे रेल्वेसह अन्य पथकाकडून या प्रकाराची चौकशी सुरू होती. फॉरेन्सीक लॅबच्या अहवालावरुन हे रसायन नेमके काय आहे हे समजेल. मात्र आरोपीचा जबाब,राज्य उत्पादन शुल्क विभाग व फॉरेन्सीक लॅबच्या प्राथमिक माहितीवरून हे रसायन ताडी किंवा सिंदी यासाठी वापरण्यात येते असे पुढे आले आहे.

दरम्यान सोमवारी (ता. तीन) लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैभव कुलमुले यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे नांदेड येथे भेट दिली. प्रकरणाची सर्व माहिती पोलिस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी त्यांना दिली. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर खरा प्रकार पुढे येणार असून आज मंगळवारी ताब्यात असलेल्या संशयीत आरोपीस लोहमार्ग औरंगाबाद न्यायालयासमोर हजर करण्यात आले.न्यायालयाकडून त्यास दि.६ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे,असे पोनि उणवणे यांनी सांगितले. मिळालेली माहिती अशी की परभणी येथील एक व्यक्ती हा निजामबाद येथून सिंदी तयार करण्यासाठी रसायन घेऊन तो परभणीसाठी कुठल्यातरी वाहनाने आला. रेल्वेने जाण्यासाठी तो रेल्वेस्थानकावर वेटिंग रुममध्ये थांबला होता. यावेळी तो पोलिसांच्या तावडीत सापडला.आधीच कोरोनाचे संकट त्यात नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकावर घडलेल्या संशयीत प्रकारामुळे रेल्वेसह स्थानिक पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिका-यांना मोठया तनावात धावपळ करावी लागली.

ग्रामिण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या