29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडमहामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेक

महामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेक

एकमत ऑनलाईन

नांदेड: परिवहन महामंडळाच्या लातुर- नांदेड बसवर दगडफेक करून अज्ञात आरोपीने एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना नांदेड-लातूर रस्त्यावर असर्जन जवळील महाराष्ट्र पंजाब बारसमोर सकाळी घडली. तर सांयकाळच्या सुमारास विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर दुस-या बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या.

राज्य परिवहन महामंडळाचे वाहक राजेश सिद्राम जिडगे हे दि. १३ जानेवारी रोजी सकाळच्या वेळी बस क्रमाक एमएच १३ सीयु ९३५२ ही लातुर येथुन प्रवाशी घेऊन नांदेडकडे निघाले होते.ही बस नांदेड- लातूर रस्त्यावरील महाराष्ट्र पंजाब बारसमोर असर्जन जवळ येताच अज्ञात इसमाने बसच्या समोरील काचावर दगड मारून काचा फोडल्या.यात अंदाजे १५ हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद चालक विश्वनाथ गिते यांनी दिली. यावरून कलम ४२७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गिते हे करीत आहेत. घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळ नांदेड आगाराचे पर्यवेक्षक इंगळे व्हि,पी. व सुरेश फुलारी यांनी भेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुस-या घटनेत विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर एमएच १४ बी.टी. १८२९ या दुस-या बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या. दरम्यान संपाच्या नाराजीतून ही घटना घडली की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या