नांदेड : भरधाव वेगातील दुचाकी व ऑटोरिक्षाची समोरासमोर धडक होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मुखेड तालुक्यातील मुखेड-नरसी रोडवरील सलगरा बु.गावाजवळ रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान दोन वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकी चक्क ऑटोत शिरून उलटी झाली़.
याबाबत माहिती अशी की, एम.एच. २६ बीवी ०३७२ ही दुचाकी रविवारी दुचारी चारच्या सुमारास मुखेडहून नरसीकडे जात होती़ तर नरसीहून ऑटो क्र. ए.पी.२३ वाय ०२५९ हा ऑटोरिक्षा मुखेडकडे येत होता़ दोन्ही वाहने मुखेड-नरसी रोडवरील सलगरा बु.गावाजवळ येताच समोरासमोर धडक झाली.
यात ऑटोचालक व दुचाकीवरील रवी माधव मुद्देवाड, वय २४ रा. मुखेड याच्या डोक्याला तर प्रशांत अशोक कडमपल्ले, वय १७ रा.मुखेड याच्या शरीरावर जखमा होऊनजखमी झाले. जखमींना उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. दरम्यान या विचित्र अपघातात भरधाव वेगातील दुचाकी ऑटोरिक्षात शिरून उलटी झाली होती़.