18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडमहावितरण कर्मचा-यांचा अजब कारभार; रात्री काम दिवसा आराम

महावितरण कर्मचा-यांचा अजब कारभार; रात्री काम दिवसा आराम

एकमत ऑनलाईन

मांडवी : येथील महावितरणच्या कर्मचारीचा मनमानी कारभार वाढली असून, कामचुकार कर्मचा-यामुळे लोकांना अंधारात राहावा लागत आहे. सकाळी बंद झालेला वीज प्रवाह रात्री नऊ वाजता सुरू करण्यात येते हे कर्मचारी दिवसा झोप काढतात का ? असा संतप्त सवाल वीज ग्राहक करीत आहे. मांडवी परिमंडळात विजेचा लपंडाव नेहमीचाच आभाळ दाटलेतर वीज बंद, पाऊस पडलेतरीवीज बंद, वारा सुटले तरी वीज बंद आणि बंद पडलेली वीज प्रवाह पुन्हा सुरू केव्हा होईल याची शास्वती नसते लाईनमेनचा मोबाईल बंद राहतो मोबाईल सुरु राहिल्यास उचत नाही.

दि. ९ ऑक्टोबर रोजी मांडवी येथील दत्त नगर, साईनगर येथील विद्युत रोहीत्रावरील फ्यूज सकाळी अकरा वाजता उडाले असता येथील काही वीज ग्राहक राजेश चव्हाण, रोशन राठोड,अतिष राठोड,गणेश चव्हाण व इतर लोकांनी लाईनमेनला प्रत्यक्ष भेटून वीज बंद पडल्याचे सांगून ते सुरू करून देण्याची विनंती केले असता लाईनमेन यांनी आरेरावीची भाषा वापरून, आता वेळ नाही दोन तीन तासांनी सुरू करतो असे सांगून मोबाइल बंद करून निघून गेले. ही बाब कनिष्ठ अभियंता यांच्या कानावर टाकल्यानंतर लाईनमेन महाशय रात्री नऊ वाजता वीज दुरुस्ती करण्याकरिता आले आणि पाच मिनीटात विज प्रवाह सुरू केले.

पाच मिनटाच्या कामाला कर्मचा-याने तब्बल दहा तास लाऊन हलगर्जीपणाचे दर्शन घडविले. मागील दोन महिन्यापूर्वी याचा लाईनमेन महाशयांनी येथील एका वीज ग्राहकाला शिविगाळ केल्याने त्यांच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी त्यांनी लेखी माफीनामा दिल्याने तक्रार मागे घेण्यात आले होते. हलगर्जीने वागणा-या लाईनमेनची हकालपट्टी करण्याची मागणी विज ग्राहकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या