34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडमहसुल विभागाची अजब नीती विनाक्रमांक वाहनाना रेती तस्करीची मूकसंमती !

महसुल विभागाची अजब नीती विनाक्रमांक वाहनाना रेती तस्करीची मूकसंमती !

एकमत ऑनलाईन

वाईबाजार (प्रशांत शिंदे) : माहूर तालुक्यात रेती तस्करीला उधान आले असून मदनापूर परिसरातील सायफळ, कोळी, पडसा परिसरात कोणतेही रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांना रेती तस्कर या घाटासह पैनगंगेच्या काठावरील गोकुळ गोंडेगाव, बोंडगव्हाण, चौफुली, येथे जोरात अवैध उत्खनन व रेती तस्करी सुरु झाली असून गेल्या दोन महिन्यात चार रेती तस्करी करणारी वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली त्यातील अनेक वाहने ही विनाक्रमांकाची असतांना सुद्धा महसूल विभागाने केवळ महसूल दंड वसूल करण्या पुरत्याच कारवाया करून रेती तस्करी करणा-या वाहन चालक व मालकांविरुद्ध रेती तस्करीची पोलिसात फिर्याद देऊन पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने परिसरात महसुल विभागाची अजब नीती विनाक्रमांक वाहनाना रेती तस्करीची मूकसंमती अशी उपहासात्मक चर्चा जोर धरत आहे.

सदर ट्रॅक्टर मालकाकडून महसुली दंड वसूल करून ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. त्यामुळे रेती तस्करांचे मनोबल प्रचंड वाढले असून विनाक्रमांकाची वाहने वापरून रेती तस्करी करण्याचा नवा फंडा बिनदिक्कत पणे सुरु केल्याचे दि. २४ फेब्रुवारी रोजी सायफळ/कोळी शिवारात तीन ट्रॅक्टर पकडले त्यापैकी एक एम.एच २९ एके २७८१ क्रमांक असलेला व दोन विना क्रमांकचे असल्याचे आढळल्याने सिद्ध झाले आहे. एक विनाक्रमांक असलेला व एक एम.एच २९ एके २७८१ क्रमांक असे दोन ट्रॅक्टर सायफळचे पोलीस पाटील हेमंत गावंडे यांच्या ताब्यात देऊन ताबा पावती लिहून घेतली असतांनाही आजपावेतो विना क्रमांकबाबत वाहन चालक व मालकाविरुद्ध कोणतीही पोलीस कारवाई झालेली नाही.

असे असले तरी महसूल विभाग केवळ महसुली दंड वसूल करून महसुली गल्ला भरण्यापुरतीच कारवाई करत असल्याने दंड भरल्या नंतर दंड भरला म्हणजे जणू काही पुढे अवैध रेती उत्खनन करून दंड भरलेली रक्कम वसूल करून घेण्याची संबंधीतास मोकळीकच मिळाली असा भोळ्या भाबड्या जनतेला संदेश देत रेती तस्कर अहोरात्र रेती तस्करी करून दोन तीन दिवसातच दंड भरलेली रक्कम रेतीच्या अवैध उत्खननाव्दारे वसूल करत जणू काही घडलेच नाही अशा तो-्यात वावरत पर्यावरणप्रेमी आक्षेपधारकावर रुबाब दाखवतांना दिसून येत आहेत.

याच माहूर तालुक्याच्या महसूल प्रशासनाने गत दोन वषार्पूर्वी काहीही संबध नसतांना तीन सज्जन नागरीकाविरुद्ध रेती तस्करीचे खोटे गुन्हे दाखल केले होते. आता धडधडीत विनाक्रमांकाच्या वाहने रेती तस्करी करीत असलेले ट्रॅक्टर पकडून महसूल कर्मचा-्यानी पंचनामे केले असतांना सुद्धा संबधिता विरुद्ध महसूल विभाग पोलिसात फिर्याद देऊन कारवाई का करीत नाही असा खडा सवाल मदनापूर परिसरातील पर्यावरण प्रेमी समाजसेवकातून व्यक्त केल्या जात आहे. परिणामी रेती तस्करांना पोलीस कारवाईचे भय उरले नसल्याने विना क्रमांकाच्या वाहनाव्दारे बिनदिक्कतपणे रेती तस्करी जोरात सुरु झाली आहे. रेती तस्करांना पोलीस कारवाईतून सूट देण्यासाठी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी ते स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील ही प्रशासकीय यंत्रणा रेती तस्करांच्या मायाजाळात तर गुंतला नाही ना ? अशी परिसरातील अनेक गावातील चावडी पारावर, हॉटेल, टपरीवर चर्चा करतांना दिसत आहे.

विष्णुपुरीत तीन दुकाने चोरट्यांनी फोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या