27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडप्लास्टिक पिशव्या बाळगणा-यांवर कडक कारवाई

प्लास्टिक पिशव्या बाळगणा-यांवर कडक कारवाई

एकमत ऑनलाईन

कंधार : प्रतिनिधी
प्लास्टिक पिशव्यांवर पालिकेचे मुख्याधिकारी दिवेकर कारभारी यांनी पथक नेमून पालिकेच्या वतीने दि २० रोजी शुक्रवारी शहरात ४ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला असून २५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही मोहिम आणखी काही दिवस सुरु ठेवली जाणार आहे. या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शासनाच्या वतीने प्लास्टिक पासून बनवल्या जाणा-या पिशव्या (कॅरीबॅग, हँडल असलेल्या व नसलेल्या थैल्या) थर्माकोल व प्लास्टिक पासून बनवण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणा-या वस्तू जसे ताट, कप, ग्लास, चमचे, वाटी, भांडे तसेच हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवेन पॉलीप्रोपिलीन बॅग्ज, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोल, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आदी साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे प्लास्टिक बाळगल्यास अथवा त्याचा वापर केल्यास पाच हजार व त्यापेक्षा अधिक दंड आकारला जाणार आहे. शुक्रवार पासून पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरु झाली आहे.

प्लॉस्टिक पिशवी वापरणा-यावर दंडात्मक कारवाई करताना पालिकेचे अधिकारी, कर्मचारी. कॅरी बॅगवर बंदी आल्याने तसेच दंडात्मक कारवाई होत असल्याने आता अनेक व्यापा-यांनी कॅरीबॅग ठेवणे बंद केले आहे. एखाद्या ग्राहकाने कॅरीबॅगची मागणी केल्यास दंडाचे पाच हजार भरा, मग कॅरी बॅग मिळेल, अशी सुचनाही व्यावसायिक करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या