29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची तयारी! रस्त्यावर बॅरिकेटस् लावणे सुरु

जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची तयारी! रस्त्यावर बॅरिकेटस् लावणे सुरु

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडुन १५ एप्रिलपासुन संचारबंदी लागु करण्यात आली होती. काही निर्बंधासह अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना यात सुट देत, ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारकडुन पुन्हा राज्यात कडक लॉकडाऊन लागु करण्याचे संकेत देण्यात आल्याने, नांदेड शहरात बुधवारी सायंकाळी प्रशासनाकडुन बॅरीकेट लावण्याची तयारी सुरू होती.

मागच्या काही दिवसापासुन राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एपिल ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागु केली होती.नांदेड जिल्हयात या आदेशाची अंमलबजावणी सुरू असून आवश्यक सेवासाठी सध्या सकाळी सात ते अकरा अशी वेळ देण्यात आली आहे.मात्र दोन दिवसापुर्वी पार पडलेल्या मंंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊन लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या संदर्भात मुख्यमंत्री बुधवारी रात्री थेट जनतेशी संवाद साधणार होते.

मात्र नाशिक येथील ऑक्सिजन दुर्घटनेमुळे त्यांचा हा लाईव्ह संवाद तुर्त रद्द करण्यात करण्यात आला. त्यामुळे आता गुरूवार नंतर कोणत्याही क्षणी राज्यात लॉकडावुन लागण्याची शक्यता असल्याने, जिल्हा प्रशासनाने त्याची पुर्व तयारी बुधवार सायंकाळपासुनच सुरू केली आहे.शहरातील विविध प्रमुख रस्त्यावर बॅरिकेटस लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राजकारण जोमात, जनता कोमात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या