29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेड‘ब्रेक द चेन’ अंर्तगत नांदेड जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

‘ब्रेक द चेन’ अंर्तगत नांदेड जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना विषाणूच्या संसगार्ची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारन आणखी कठोर निर्बंध लागू केले असून हे निर्बंध गुरुवारी रात्री ८ वाजेपासून लागू होणार आहेत. १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.विनाकारण घराबाहेर पडता येतणार नाही. नव्या नियमानुसार आंतरजिल्हा प्रवास करणा-यांना १४ दिवस होम क्वारंटाइन ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. विवाह समारंभास फक्त दोन तासाचा वेळ देण्यात आला असून नियम मोडल्यास ५० हजाराचा दंड लागणार आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ब्रेक द चेन मिशन अंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने याबाबत नवीन नियमावली जाहीर केली असून आज दि. २२ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राहतील. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू केल्या जातील.

ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीषार्खाली यापूर्वी १३ एप्रिल २०२१ ला दिलेल्या आदेशातील कलम ५ मधे नमूद केल्यानुसार इतर सर्व कार्यालयांमधे केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील. ब्रेक दि चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीषार्खाली यापूर्वी १३ एप्रिल २०२१ ला दिलेल्या आदेशातील कलम ५ मधे नमूद केल्यानुसार इतर सर्व कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील.

सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणा-या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांवर जाणार नाही, हे बघावे. जीवनावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरवण्याच्या कामी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे.

विवाहसमारंभ साजरे करताना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमधे केले जावेत आणि कमाल २ तासात हे कार्यक्रम करताना जास्तीत जास्ती २५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील. याचे पालन न करणा-या किंवा या निबंर्धांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ कोविड-१९ ची आपत्ती आहे तोवर बंद केले जाईल.

बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मयार्दा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुस-या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. या आदेशांचा भंग करणा-यांना १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

१४ दिवस गृहविलगीकरण: सर्व थांब्यांवर उतरणा-या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल.

सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी इत्यादी) यांना त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट आणि पासेस देण्यात येईल. या आदेशात सामील नसलेल्या इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या १३ एप्रिल २०२१ व तदनंतर त्यात केलेले सुधार लागू पडतील.

अत्यवश्यक सेवेतील दुकानांना मुभा
दरम्यान आपत्कालीन उपाययोजनचा भाग म्हणून संदर्भ क्र.५ वरन दि.२० एप्रिल रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्हयात अत्यवश्यक सेवेतील किराणा दुकाने, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री,अंडी, मटण, चिकन, मासे विक्री,कृषी संबंधित सर्व सेवा, पशूखाद्य विक्री व सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ सुरु राहणार ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.सदर आदेश दि.१ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत,असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

मनाचिये दारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या