28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home नांदेड लोह्यात पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत कडकडीत बंदचा निर्णय

लोह्यात पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत कडकडीत बंदचा निर्णय

एकमत ऑनलाईन

लोहा : कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी न.पा.ने दि‌.७ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत असे ९ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात नागरिकांची आरोग्य चांगले रहावे तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग थांबावा त्यासाठी नगर परिषद व व्यापारी यांनी लोहयातील बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे. नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी आमदार रोहिदास चव्हाण , उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, पोलिस निरीक्षक भागवत जायेभाये, केशव मुकदम दत्ता वाले, करीम शेठ व कॉंग्रेस चे गटनेते पंचशील कांबळे व सर्व नगरसेवक लोहा शहरातील व्यापारी दुकानदार सामान्य नागरिक याची या संदर्भात तीन तास व्यापक बैठक झाली.

बाजारपेठेत होणारी गर्दी लोकांकडून प्रतिबंधक उपाय योजनेकडे होणारे दुर्लक्ष पाहता कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष व त्यांच्या सहका-यांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करून हा जनता कर्फ्युचा निर्णय घेतला आहे.

व्यापारी, दुकानदारांनी व लोहा शहरातील जनतेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे जाहीर आव्हान लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी , माझी आमदार रोहिदास चव्हाण साहेब उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार ,मुख्य अधिकारी अशोक मोकले कॉंग्रेस चे गटनेते पंचशील कांबळे व सर्व नगरसेवकांनी केले आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलिन व्हावे, काँग्रेसने शरद पवारांना अध्यक्ष करावे! – रामदास आठवलेंचा सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या